vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

लातूर, प्रतिनिधी : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फतखरीप हंगाम 2026-27साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच अर्ज प्रक्रिया स्वतंत्रऑनलाइन पोर्टलद्वारेराबविण्यात येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत10 ऑगस्ट 2026आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.inसंकेतस्थळावरील’पीक स्पर्धा नोंदणी’टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीदिलीप जाधवयांनी केले आहे.

पीकस्पर्धेअंतर्गत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या11 खरीप पिकांचासमावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर होणार आहे. तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे पुढील स्तरासाठी विजेत्यांची निवड केली जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. भातासाठी किमान20 गुंठे, तर इतर पिकांसाठी40 गुंठे सलग क्षेत्रअसणे बंधनकारक आहे.अर्जासोबतफार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र, बँक खाते तपशील व पासबुकच्या पहिल्या पानाची प्रतजोडावी लागणार आहे.

सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क300 रुपये, तर आदिवासी गटासाठी150 रुपयेनिश्चित करण्यात आले आहे.पीकस्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तालुकास्तरावर पहिले5 हजार, दुसरे3 हजारआणि तिसरे2 हजार रुपये; जिल्हास्तरावर पहिले10 हजार, दुसरे7 हजारआणि तिसरे5 हजार रुपये; तर राज्यस्तरावर पहिले50 हजार, दुसरे40 हजारआणि तिसरे30 हजार रुपयेबक्षीस दिले जाणार आहे.याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने कळवले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन…