vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ स्पर्धेत युवक-युवतींनी सहभागी व्हावे जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी,जिल्हास्तरीय स्पर्धा; प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपयांचे पारितोषिक…

माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ स्पर्धेत युवक-युवतींनी सहभागी व्हावे जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी,जिल्हास्तरीय स्पर्धा; प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपयांचे पारितोषिक…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी 21 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जलसंधारण दिनानिमित्त दि. 15 ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ ही समाजमाध्यमावरील रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील यांनी केले आहे.

 

‘माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित उद्या घडवा’या स्पर्धेचे घोषवाक्य ‘माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित उद्या घडवा’ असे आहे.

 युवक-युवतींनी आपल्या रीलच्या माध्यमातून मातीसंवर्धन, जलसंधारण, पाणी बचत, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा संदेश प्रभावीपणे मांडावा. स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदांची रील तयार करून ती आपल्या सार्वजनिक समाजमाध्यम खात्यावर प्रसिद्ध करावी. रीलच्या सुरुवातीला स्पर्धेचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्याला टॅग करणे आणि #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे

स्पर्धेतील उत्कृष्ट रीलची जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ या नावाने सन्मानित करण्यात येणार असून, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकासह प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे.

नोंदणी प्रक्रियास्पर्धेसाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत एक अधिकृत QR Code तयार करण्यात येईल. QR Code स्कॅन केल्यानंतर नोंदणी → Reel Link सादर करणे → जिल्हा निवड → पडताळणी → सहभाग प्रमाणपत्र अशी सुलभ प्रक्रिया राहील.

                                                         https://register.mahaevent.co.inस्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://register.mahaevent.co.in⁠ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.‘एक रील… मातीसाठी! एक रील… पाण्यासाठी! एक रील… सुरक्षित भविष्यासाठी!’ या संदेशासह जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 22 पेक्षा अधिक महापालिका जिंकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठरला सर्वांत मोठा विजयी पक्ष.

vishwatmaklokswamivarta

माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम-संवाद

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम-   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा ⁠तीन महिन्यात 13 हजार पट्टेवाटप करणार..

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त भरगच्च कार्यक्रम–गुरू गणेश भवनमध्ये स्वीकारणार शुभेच्छा …