vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा,कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहननवी मुंबईत ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

      ठाणे, प्रतिनिधी): व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

नेरूळ येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीज सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आयोजित या सोहळ्यास वन मंत्री गणेश नाईक, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेश बालदी, रवींद्र फाटक, विक्रम पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पनवेलच्या महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

         मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांचे आकर्षण आणि त्याचे होणारे गंभीर सामाजिक, शारीरिक व मानसिक परिणाम लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयीन परिसर हा युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याने या वयोगटात योग्य माहिती व जागरूकता निर्माण करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

भारताच्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशाची ६५% युवाशक्ती ही आपली मोठी ताकद आहे. या युवाशक्तीला निष्प्रभ करण्यासाठी शत्रू राष्ट्रे आणि असामाजिक घटक तरुणांना व्यसनाच्या आहारी घालण्याचे षड्यंत्र रचत आहेत. या लढाईत अमली पदार्थांची पुरवठा साखळी पूर्णपणे नेस्तनाबूत करणे आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करून अशा पदार्थांची मागणी संपवणे, असा सर्वांगीण ३६०-डिग्री अप्रोच ही काळाची गरज आहे.

‘नो टू ड्रग्ज’चा संदेश,

प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हे या लढाईचे केंद्र असून प्रत्येक विद्यार्थी या नशाविरोधी मोहिमेचा सैनिक आहे. व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना भेदभाव न करता व्यसनमुक्ती केंद्रांच्या (डी-एडिक्शन सेंटर) माध्यमातून मदत केली जाईल. तरुणाईच्या साथीने नशा पराभूत होईल आणि ‘सुजलाम सुफलाम’ व विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केलापोलीस, महानगरपालिका, नागरिक आणि तरुणाईच्या संयुक्त प्रयत्नांतून नवी मुंबईला पूर्णपणे नशामुक्त आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प या वेळी सोडण्यात आला.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र व व्यसनमुक्त चित्रफितीचे यावेळी लोकार्पणही करण्यात आले. या अभियानानिमित्त आयोजित जनजागृतीपार पोस्टर्स व रील्स स्पर्धेतील प्रत्येकी तीन सर्वोत्तम विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान.

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव भारत टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार

vishwatmaklokswamivarta