
2.70 लाखाहून अधिक नागरिकांची आयुष्मान कार्ड निर्मिती – आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन
आरोग्य प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB-PMJAY)’ या अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत दिले जात आहेत. यामध्ये गंभीर आजार, शस्त्रक्रिया, आणि रुग्णालयात भरती असताना होणारा सर्व खर्च समाविष्ट आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता ‘आयुष्मान कार्ड’ असणे गरजेचे असून आयुष्मान कार्ड काढण्याकरिता लाभार्थीचे ऑनलाईन रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच हे ऑनलाईन रेशन कार्ड अद्ययावत आधार व मोबाइल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाकडून आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत 2,71,809 इतक्या लोकसंख्येची आयुष्मान कार्ड निर्माण करण्यात आलेली आहेत.
पात्र लाभार्थी नागरिकांना आपल्या जवळच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच रेशनींग दुकानामध्ये किवा जवळच्या ई- सेवा सुविधा केंद्रामध्ये आपले आयुष्मान कार्ड बनवून घेता येईल. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थी यांना यांनी आपले आयुष्मान कार्ड निर्माण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे
आयुष्मान कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ अंगीकृत शासकीय किवा खाजगी रुग्णालय याठिकाणी घेता येतो. उपचार किंवा शस्त्रक्रियेकरिता अंगीकृत रुग्णालायत दाखल होते वेळी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र / आरोग्य मैत्रीण यांना संपर्क करून आयुष्मान कार्डद्वारे योजनेंतर्गत नोंदणी (preauthorization) करणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक रुग्णालय वाशी, ऐरोली व नेरूळ तसेच माता बाल रुग्णालये – तुर्भे व बेलापूर अशी एकूण 5 महापालिका रूग्णालये या योजनेसाठी अंगीकृत असून इतर खाजगी रुग्णालयेही या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात आलेली आहे.
· महात्मा गांधी मिशन ट्रस्ट हॉस्पिटल, सीबीडी.· डॉ. अजयन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरखैरणे· डॉ.आर एन पाटील सुरज हॉस्पिटल, सानपाडा· श्री हॉस्पिटल, सेक्टर 17, वाशी· क्रिटीकेअर आयसीयू अँड सुपरस्पेशलिटी सेंटर, सेक्टर 16, ऐरोली· डिवाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घणसोली· साई स्नेहदीप हॉस्पिटल, कोपरखैरणे, सेक्टर 20· सुयश हॉस्पिटल, सेक्टर 40, करावे, नेरुळ· इंद्रावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घणसोली· न्यू मानक हेल्थकेअर हॉस्पिटल, नेरूळ· तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल, नेरूळ.· महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सेक्टर 30, वाशी· डॉ. महाजन हॉस्पिटल, रबाळे· लायन सर्विस सेंटर ट्रस्ट हॉस्पिटल, कोपरखैरणे मंगल प्रभू नर्सिंग होम, सानपाडा· सनशाइन हॉस्पिटल, नेरूळ इंद्रावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, ऐरोली· एम पी सी टी हॉस्पिटल, सानपाडा· क्रिडेन्स केअर हॉस्पिटल, घणसोली· मयुरेश हॉस्पिटल, वाशी एम जे माधव सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, वाशी.· अपेक्स किडनी डायलिसिस हॉस्पिटल, सेक्टर 30, वाशी· इंडियन बर्न्स हॉस्पिटल, ऐरोली· एमजीएम हॉस्पिटल, वाशी· श्रुषशा हार्ट केअर सेंटर अँड स्पेशलिटी हॉस्पिटल, नेरूळ· डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल रिसर्च सेंटर, नेरूळ· पंजाब केसरी चॅरिटेबल ट्रस्ट जनरल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, वाशी· श्री रामकृष्ण नेत्रालय हॉस्पिटल, वाशी.या अंगीकृत रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या वैदकीय तज्ज्ञ सेवासुविधेप्रमाणे योजने अंतर्गत दाखल झाल्यास लाभ घेता येतो.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार अथवा शस्त्रक्रियेकरिता दाखल झाल्यास एखाद्या लाभार्थीकडे आयुष्मान कार्ड नसल्यासही योजनेंतर्गत लाभ घेता येतो. त्याकरिता अंगीकृत रुग्णालयामध्ये दाखल होतेवेळी रुग्णालयातील आरोग्यमित्र / आरोग्यमैत्रीण यांचेशी संपर्क साधून रेशन कार्ड आणि आधारकार्ड ची छायांकित प्रत सादर करावी, जेणेकरून त्वरित आयुष्मान कार्ड निर्माण करता येईल व योजनेचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे रेशन कार्ड उपलब्ध नसल्यास संबंधित तहसीलदार कार्यालयातून शासनाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यातील तहसीलदार प्रमाणपत्र अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र / आरोग्यमैत्रीण यांना सादर करावे जेणेकरून आयुष्मान कार्ड निर्माण करणे शक्य होईल व योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने नवी मुंबईतील सर्व रहिवाशी यांना आवाहन करण्यात येत आहे की, आपले आयुष्मान कार्ड निर्माण करणेकरिता संबंधित रेशनींग कार्यालयातून ऑनलाईन रेशन कार्डची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून आयुष्मान कार्ड निर्माण करणे शक्य होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड नसेल तरी योजनेचा लाभ घेण्याकरिता योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालय याठिकाणी दाखल होते वेळी सोबत रेशन कार्ड व आधार कार्डची छायांकित प्रत ठेवावी व अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र / आरोग्यमैत्रीण यांच्याशी समन्वय साधावा असेही आवाहन आहे.



