vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

आई’ पर्यटन धोरणाद्वारे महिलांना पर्यटन व्यवसायात नवी दिशा

आई’ पर्यटन धोरणाद्वारे महिलांना पर्यटन व्यवसायात नवी दिशा

ठाणे, प्रतिनिधी : पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘आई’ (AAI) हे महिला केंद्रित पर्यटन धोरण लागू केले आहे. या महत्त्वाकांक्षी धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि तळागाळातील महिलांपर्यंत यातील योजनांची माहिती पोहोचावी, यासाठी कोकण विभागीय पर्यटन कार्यालयाने जिल्हास्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

     या उपक्रमामुळे महिला पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळण्यासोबतच स्थानिक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मोठी मदत होणार आहे.      या मोहिमेत स्थानिक वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन या पारंपरिक माध्यमांसह समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून धोरणाची वैशिष्ट्ये, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. विशेषतः महिला बचत गट, स्वयं सहायता गट, नवउद्योजक महिला आणि विविध संस्थांपर्यंत पोहोचून या क्षेत्रातील व्यावसायिक संधी समजावून सांगितल्या जातील.

 इच्छुक महिलांना अर्ज व कागदपत्रांच्या अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या संकेतस्थळाचा संदर्भ घेता येईल.     जिल्ह्यातील महिलांनी, बचत गटांनी आणि उद्योजकांनी या धोरणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालय, कोकण च्या उपसंचालक डॉ.प्रज्ञा मनोहर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यात खरीपसाठी मुबलक #खत साठा उपलब्ध• शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये

घनसावंगी आणि अंबड येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय,म्हैसपालन प्रशिक्षणाचे आयोजन

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta

रितसर परवानगी घेऊनच जाहिराती प्रसिध्दीचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

अमृतची हरित ऊर्जा क्षेत्राकडे वाटचाल; राज्यभरात ‘अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन’ उपक्रमयुवक, महिला व ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी