vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी ‘शब्द सुरांची मैफल’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी ‘शब्द सुरांची मैफल’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक प्रतिनिधी-ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी ‘शब्द सुरांची मैफल’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५ येथे होणार आहे.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यासोबतच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा सांगीतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी संगीत क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या अशोक पत्की यांच्या विविध लोकप्रिय गीतांचा सांगीतिक प्रवास या मैफलीच्या माध्यमातून उलगडणार आहे.

कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. मुंबईतील संगीतप्रेमी, कलारसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ही विशेष मैफल अनुभवावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

झी २४ तास मराठी सन्मान २०२५’ पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह मान्यवर

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या दोन दिवसीय शास्त्रीय कार्यक्रमात ‘स्वरसुधा’चा सहभाग

vishwatmaklokswamivarta

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार ‘चित्रसूर्य’ कार्यक्रमातून जेष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या मराठी सिनेमातील आठवणींना उजाळा

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास निधन झाले. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या स्मृतिदिन उत्साहात साजरा 

🎥 महालक्ष्मी सरस नवी मुंबई २०२६: रील चॅलेंज आता सुरू! 🏆मुंबई आणि नवी मुंबईतील कंटेंट क्रिएटर्स—तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी