vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरू सात खरेदी केंद्रांना मान्यता..

सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरू सात खरेदी केंद्रांना मान्यता..

सातारा, प्रतिनिधी :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरिप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य (मका/ज्वारी/बाजरी) खरेदी करण्यासाठीची पूर्वतयारी बैठक मा. जिल्हाधिकारी महोदय, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सातारा जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे

भरडधान्य (मका) खरेदीः ०२ केंद्रांवर ४४८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, ३४४ शेतकऱ्यांकडून ९४२७.५० क्विंटल मका खरेदी करण्यात आली व शेतकऱ्यांना २,२६,२६,०००/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड सोयाबीन खरेदीः ०९ केंद्रांवर ८४२ शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८१६ शेतकऱ्यांकडून ९७११.०० क्विंटल सोयाबीन खरेदी करून ५,१७,४०, २०८/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड चना खरेदीः ०९ केंद्रांवर ९० शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८० शेतकऱ्यांकडून ८७९.०० क्विंटल चना खरेदी करून ५१,६४,१२५/- रुपये अदा करण्यात आले.

मागील हंगामात सुरळीत व विना-तक्रार कार्यरत असलेली २ केंद्रे (फलटण व माण (दहिवडी)) या हंगामातही कायम ठेवण्यात आली असून, शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी नवीन ५ केंद्रे जोडण्यात आली आहेत. त्यानुसार एकूण ७ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडेल.

पूर्वीची कार्यरत २ केंद्रेः फलटण व माण (दहिवडी) नवीन मंजूर ५ केंद्रे सातारा, वाई, मसूर, कोरेगाव व कवठे. शेतक-यांनी मुदतीत आपल्या नजीकच्या अधिकृत केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

vishwatmaklokswamivarta

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतलाभक्तांच्या सेवेचा आनंद

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश भूषण गवई हेच बेंचचे शिल्पकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळावा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी