vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

इंडिया स्किल्स स्पर्धेमध्ये कौशल्य दाखविण्याची युवकांना संधी६३ कौशल्य प्रकारांचा समावेश; जिल्ह्यातील युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

इंडिया स्किल्स स्पर्धेमध्ये कौशल्य दाखविण्याची युवकांना संधी६३ कौशल्य प्रकारांचा समावेश; जिल्ह्यातील युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : विविध क्षेत्रांतील कौशल्य असलेल्या युवकांना आपले कौशल्य राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळणार असून, इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ (India Skills Competition) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील कौशल्यवान युवकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

या स्पर्धेत रंगकाम, मातीकाम, सुतारकाम, शेती, दागिने बनविणे, राजमिस्त्री काम, फॅशन टेक्नॉलॉजी, छायाचित्रण, चित्रकला, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डिंग, बेकरी, सौंदर्यशास्त्र, आरोग्य व सामाजिक कार्य, हॉटेल व्यवसाय, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, माहिती तंत्रज्ञान, दंत चिकित्सा आदी एकूण ६३ कौशल्य प्रकारांचा समावेश आहे.

शिक्षणापेक्षा कौशल्याला प्राधान्य,या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची अट नाही. त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या, मात्र एखाद्या क्षेत्रात उत्कृष्ट कौशल्य असलेल्या युवकांनाही आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांच्या जन्मतारखेबाबत संबंधित कौशल्य प्रकारानुसार पात्रता निश्चित करण्यात आली असून, ५६ कौशल्य प्रकारांसाठी १ जानेवारी २००६ नंतरचा, तर ७ कौशल्य प्रकारांसाठी १ जानेवारी २००३ नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे.

असा करता येईल ऑनलाइन अर्ज : स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना प्रथम मोबाईल क्रमांक नोंदवून प्राप्त झालेला ओटीपी टाकावा. त्यानंतर आधार क्रमांक, शैक्षणिक माहिती आणि संबंधित कौशल्याची माहिती भरावी. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराची स्पर्धक म्हणून नोंदणी होईल.अडचण आल्यास कौशल्य विकास केंद्रात मार्गदर्शन : ऑनलाइन अर्ज करताना अडचण येणाऱ्या युवकांनी बुलडाणा येथील बस स्थानक परिसरालगत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. येथे स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल.

बुलडाणा जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कौशल्य असलेल्या युवकांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील तसेच कमी शिक्षण असलेल्या युवकांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आपल्या कौशल्याचे महत्त्व ओळखावे आणि इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ (India Skills Competition) मध्ये सहभागी व्हावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

उद्योजकतेची नवी पहाट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये बदल*

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती- जमातीच्या बेरोजगारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

vishwatmaklokswamivarta