vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीचे भाडेमीटर ३० नोव्हेंबरपर्यंत रिकॅलिब्रेशन करून घेण्याचे आवाहन-विहित मुदतीनंतर दररोज ५० रुपये, कमाल ५ हजार रुपये विभागीय दंडात्मक शुल्क; अलिबाग व पेण तालुक्यातील वाहनधारकांसाठीही लागू

ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीचे भाडेमीटर ३० नोव्हेंबरपर्यंत रिकॅलिब्रेशन करून घेण्याचे आवाहन-विहित मुदतीनंतर दररोज ५० रुपये, कमाल ५ हजार रुपये विभागीय दंडात्मक शुल्क; अलिबाग व पेण तालुक्यातील वाहनधारकांसाठीही लागू

रायगड, प्रतिनिधी : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी यांच्या भाडेदरात वाढ करण्यात आली असून, नवीन भाडेदरानुसार भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील, तसेच पेण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अलिबाग व पेण या दोन तालुक्यांतील सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सीधारकांनी दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मीटर रिकॅलिब्रेशन संस्थांनी त्यांच्या निर्धारित कार्यक्षेत्राबाहेरील ऑटोरिक्षा किंवा मीटर टॅक्सीला रिकॅलिब्रेशन प्रमाणपत्र जारी करू नये. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील रिकॅलिब्रेशन संस्थांकडून जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र स्वीकारू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.

विहित मुदतीत भाडे मीटरचे रिकॅलिब्रेशन न केल्यास दि. १ डिसेंबर २०२६ पासून संबंधित ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक अथवा मालकाकडून विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये विभागीय दंडात्मक शुल्क आकारण्यात येईल. हे शुल्क कमाल ५ हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येणार आहे.

भाडेमीटर सील करण्यासाठी ऑटोरिक्षाच्या मीटरसाठी एक रेटो सील, आवश्यकता असल्यास दोन रेटो सील, तर टॅक्सी मीटरसाठी एकूण दोन रेटो सील वापरणे आवश्यक राहील. मीटरमध्ये बसविण्यात आलेल्या सीलचे क्रमांक संगणकीय बीजकावर नमूद करणे बंधनकारक असून, हस्तलिखित बीजकाचा वापर करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मीटर संबंधित सेवांसाठी निश्चित शुल्कसर्व मीटर उत्पादकांनी मीटर भाडे नूतनीकरण कार्यक्रमाचे शुल्क समान आकारावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीसह निश्चित करण्यात आलेले शुल्क पुढीलप्रमाणे आहे : मीटर उत्पादक – २८० रुपये, मीटर दुरुस्ती – २७५ रुपये, मीटर तपासणी – १२० रुपये आणि मीटर सील – २५ रुपये. एकूण शुल्क – ७०० रुपये.

मीटर उत्पादक, रिकॅलिब्रेशन करणाऱ्या संस्था तसेच मीटर दुरुस्ती करणाऱ्यांनी निर्धारित शुल्काचा फलक त्यांच्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.ऑटोरिक्षा व टॅक्सीधारकांनी विहित मुदतीची नोंद घेऊन आपल्या वाहनाच्या भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन वेळेत करून घ्यावे. प्रवाशांकडून नवीन भाडेदरानुसार योग्य भाडे आकारले जावे आणि मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत संबंधित नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000

संबंधित पोस्ट

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यावरणीय वारशाला सलाम..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

गणेश उत्सव मंडळांना वर्गणी जमा करावयाची असल्यास**सहाय्यक धार्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक*

कराटे योद्धा एसोसिएशनच्या विजेत्यांची,थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी….

vishwatmaklokswamivarta