vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाळा परिसर तंबाखूमुक्त करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

शाळा परिसर तंबाखूमुक्त करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी-जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करा.तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करा,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी छाया आवरगावकर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे आकाश तळवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे डी. व्ही. पाटील, कामगार अधिकारी अक्षय ठोकळ यांच्यासह आरोग्य, शिक्षण, पोलीस व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस असलेल्या प्रतिबंधाची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रत्येक शाळेने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेसाठी निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करावी. यासाठी शिक्षण विभागासह संबंधित यंत्रणांनी नियमित कार्यवाही करावी.

 सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम (COTPA-२००३) अंमलबजावणीसाठी पथके सक्रिय करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित कारवाई करावी. तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिराती तसेच प्रायोजकत्वासंदर्भातील उल्लंघनांवर नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

 ग्रामपंचायती, शाळा-महाविद्यालये आणि विविध शासकीय विभागांच्या सहभागातून तंबाखूविरोधी जनजागृती अधिक व्यापक करावी. विशेषतः विद्यार्थी व युवकांना तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवावेत, असेही जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.

 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध विभागांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा यावेळी आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे सादर करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

०००००

संबंधित पोस्ट

घणसोली बेघर निवारा केंद्रात जागतिक बेघर दिनानिमित्त सामाजिक कृतज्ञता कार्यक्रम संपन्न 

vishwatmaklokswamivarta

खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित 

आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी  -जिल्हाधिकारी किशन जावळे

व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारी जिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*