vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९३ वी जयंती जिल्हा कार्यालयात साजरी करण्याचे निर्देश

स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९३ वी जयंती जिल्हा कार्यालयात साजरी करण्याचे निर्देश

बुलढाणा, प्रतिनिधी : स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९३ वी जयंती २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना निमंत्रित करण्यात यावे. कार्यक्रमात स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात यावे. तसेच त्यांनी केलेले सामाजिक कार्य, माथाडी कामगार चळवळीतील योगदान आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात यावी.

प्रत्येक जिल्हा समन्वयकाने संबंधित जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यक्रमाची प्रसिद्धी स्थानिक वृत्तपत्रांमधून करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, तालुकानिहाय लाभार्थी संख्या तसेच वितरित करण्यात आलेल्या व्याज परताव्याची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.कार्यक्रमाचे आयोजन काटेकोर नियोजन व योग्य पद्धतीने करण्यात यावे. कार्यक्रमानंतर छायाचित्रे, प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची वृत्तपत्र कात्रणे, लाभार्थ्यांची माहिती तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा संक्षिप्त अहवाल संबंधित विभागीय समन्वयकांमार्फत महामंडळाच्या मुख्यालयास ई-मेलद्वारे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा समन्वयकांनी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय राहील याची खात्री करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मानकापुरातील उपक्रमात हजारोंचा सहभाग; मुख्यमंत्र्यांनीही केली तीन शिवलिंगांची निर्मिती

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू