vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

३० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ विशेष आरोग्य अभियान …

३० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ विशेष आरोग्य अभियान …

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत ३० वर्षांवरील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि असंसर्गजन्य आजारांच्या (NCD) वेळेत निदानासाठी ‘तिशीचा पल्ला – तपासणी अन् सल्ला’ हे विशेष आरोग्य अभियान राबवले जात आहे. हे अभियान 1 सप्टेंबरपासून 10 डिसेंबर 2026 या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविले जात आहे. ३० वर्षांवरील नागरिकांना या आरोग्य सुविधेचा लाभ देण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या विविध गंभीर आजारांचे लवकर निदान करून त्यावर आधीच वेळेवर उपचार करणे हा मुख्य उद्देश आहे. यामध्ये नागरिकांची प्राथमिक तपासणी थेट त्यांच्या घरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. अभियानांतर्गत केल्या जाणाऱ्या प्रमुख आरोग्य तपासण्या:(1) रक्तातील साखरेचे प्रमाण मोजून मधुमेहाचे वेळेत निदान करणे.(2) रक्तदाबाची नियमित तपासणी करून हृदयविकाराचा धोका टाळणे.(3) तंबाखू, गुटखा किंवा इतर कारणांमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी करणे.(4) महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे वेळीच निदान करणे.(5) महिलांमध्ये वाढत्या स्तनांच्या कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यात तपासणी करणे.     वरीलप्रमाणे महत्वाच्या आरोग्य तपासण्या करून ‘लवकर तपासणी – योग्य निदान – वेळेवर उपचार’ या त्रिसूत्रीस अनुसरून नवी मुंबईतील तिशीच्या पुढील नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता राखत हे विशेष आरोग्य अभियान महानगरपालिकेच्या वतीने राबविले जात आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 30 वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष नागरिकांनी आपल्या घरी याकामी भेट देणा-या आरोग्य कर्मचा-यांना तपासणीकामी पूर्ण सहकार्य करावे आणि प्राथमिक तपासणीनंतर पुढील सल्ल्यासाठी व आवश्यक उपचारांसाठी आपल्या जवळच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

रोह्यात ग्रामदैवत श्री धावीर महाराजांना 165 वी सशस्त्र पोलीस मानवंदना-धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी..

vishwatmaklokswamivarta

ठाणे पश्चिम येथील  प्रीती सँडविच दुकानाला लागली भीषण आग आग आटोक्यात कोणतीही जीवितहानी नाही

पोलादपूर नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

vishwatmaklokswamivarta

अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजन

vishwatmaklokswamivarta