वाराणसी येथे ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’च्या ९४ व्या उपक्रमाचं आयोजन
राज्य प्रतिनिधी-
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली वाराणसी येथे ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’च्या ९४ व्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली वाराणसी येथे ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’च्या ९४ व्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ ही संकल्पना घेऊन झालेल्या या उपक्रमात ५०० हून अधिक सायकलस्वार आणि एक हजाराहून अधिक जण सहभागी झाले. तरुणांनी तंदुरुस्तीला दैनंदिन जीवनाचा भाग बनवून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असं आवाहन मांडविया यांनी केलं.