vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जालन्याच्या कैलास झोळगे यांची थक्क करणारी झेप; आशियाई कांस्यपदकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!शाकाहारी फुल आयर्नमॅनचा युवक-महिलांना संदेश – “फिटनेस हीच खरी संपत्ती”

जालन्याच्या कैलास झोळगे यांची थक्क करणारी झेप; आशियाई कांस्यपदकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!शाकाहारी फुल आयर्नमॅनचा युवक-महिलांना संदेश – “फिटनेस हीच खरी संपत्ती”

प्रतिनिधी / जालना-जालना जिल्ह्याचे सुपुत्र, जलतरणपटू अष्टपैलू खेळाडू श्री. कैलास झोळगे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास रचला ऑलम्पिक संघटनेची संलग्न असलेल्या स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया (SFI )यांच्या वतीने एशियन मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कर्नाटकातील बंगळुरू येथील द्रविड स्पोर्ट्स एक्सलन्स येथे अत्याधुनिक जलतरण संकुलात ४ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडल्या मागील वर्षी जपान येथे पार पडली तर ह्या वर्षी भारताला यजमानपद भेटले दुसऱ्या आशियाई मास्टर जलतरण चॅम्पियनशिप_ मध्ये कैलास त्यांनी भारताच्या तिरंग्याची शान वाढवली आहे. आशिया खंडातील जपान, सिंगापूर, थायलंड, मलेशिया , चीन,इराण,ओमान,कझाकिस्तानसह २० हून अधिक देशांतील १२०० हून अधिक कसलेल्या आणि अनुभवी जलतरणपटूंच्या उपस्थितीत झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण या सर्वात तांत्रिक आणि ताकदीच्या प्रकारात त्यांनी _कांस्यपदक पटकावत जालना जिल्ह्याचे नाव आशिया खंडात रोशन केले आहे. या प्रकारात पदकासाठी झालेली चुरस अत्यंत अटीतटीची होती, जिथे क्षणाच्या काही भागात पदकाचा फैसला होतो. अशा दबावाच्या परिस्थितीतही कैलासजींनी आपल्या वर्षानुवर्षांच्या अनुभवाच्या, अचूक तंत्राच्या आणि अफाट जिद्दीच्या जोरावर तिसरा क्रमांक पटकावला. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कठोर निवड चाचणीतून निवड होऊन, अनेक आर्थिक आणि शारीरिक अडथळ्यांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे कांस्यपदक, कोणत्याही सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. ही केवळ एका पदकाची गोष्ट नसून, ती जालन्यातील प्रत्येक खेळाडूसाठी जगण्याची नवी प्रेरणा आहे

८१ किमी भागीरथी – मृत्यूला हरवणारी जिद्द!जगातील सर्वात कठीण आणि मोठी मानली जाणारी ८१ किमी भागीरथी नदी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे कैलास झोळगे हे देशातील मोजक्या खेळाडूंपैकी एक आहेत. भागीरथी नदीच्या प्रचंड प्रवाहात, रात्रंदिवस पाण्यात राहून, लाटांशी, थकव्याशी आणि थंडीशी झुंज देत हे अंतर कापणे म्हणजे केवळ खेळ नाही, तर मृत्यूवर मात करण्याची जिद्द आहे. अनेक जण १-२ किमी पोहून थकतात, तिथे ८१ किमीचा हा प्रवास म्हणजे हिमालय सर करण्यासारखाच आहे.

शाकाहारी जालन्याचे पहिले फुल आयर्नमॅन – मांसाहाराशिवायही अशक्य शक्य!आज अनेकांना वाटते की ताकदीसाठी मांसाहार आवश्यक आहेत, पण कैलासजींनी हा गैरसमज खोटा ठरवला आहे. ते कट्टर शाकाहारी असूनही ‘फुल आयर्नमॅन’ आहेत. म्हणजेच एकाच दिवशी ३.८ किमी पोहणे + १८० किमी सायकलिंग + ४२.२ किमी मॅरेथॉन धावणे!असे एकूण226 की मी केवळ 15 तासात पूर्ण करून हा पराक्रम त्यांनी सिद्ध केले की, शुद्ध शाकाहारी आहार, डाळ-भात-भाकरी आणि सात्विक जेवणातही विश्वविक्रम करण्याची ताकद आहे.तसेच६०० किमी सायकलिंग – फ्रान्सच्या BRM मध्ये भारताचा झेंडा!

फ्रान्सच्या Audax Club Parisien ने आयोजित केलेली जगातील सर्वात कठीण BRM सायकलिंग मालिका -किमी, ४०० ,३०० किमी आणि ६०० किमी चे टप्पे त्यांनी अविरतपणे करून त्यानं पोडियम फिनिशर्स ठरले केले आहेत. ६०० किमी म्हणजे जालना ते गोवा आणि परत! सलग 33 तास झोप न घेता, पायांना विश्रांती न देता सायकल चालवणे, हे फक्त पायांचे नाही तर मनाचेही बळ आहे. या कामगिरीमुळे त्यांना सुपर रँडोनियर हा आंतरराष्ट्रीय किताबही मिळाला आहे.

संघर्षातून यशाकडे – खरी प्रेरणादायी वाटचाल!या यशामागे मोठा संघर्ष आहे. नोकरी, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पहाटे ४ वाजता उठून सराव, जालन्यात अद्ययावत सोयी नसताना केलेली तयारी, आर्थिक अडचणी आणि निवड चाचणीतील आव्हाने – या सगळ्यांवर त्यांनी त्यांच्या पत्नी, कुटुंबाच्या सहाय्याने मात केली. त्यांची अनमोल साथ हेच माझ्या यशाचे रहस्य असे झोळगे ह्यांनी नमूद केले.अनेक खेळाडू, महिला आणि पुरुषांसाठी प्रेरणास्थान!

१. महिलांसाठी संदेश : “वय, संसार, जबाबदारी हे अडथळे नाहीत. रोज फक्त एक तास स्वतःसाठी काढा.”२. पुरुषांसाठी संदेश : “व्यसन, मोबाईल आणि टेन्शन सोडा. फिटनेस नसेल तर पैसा, पद, प्रतिष्ठा सगळे व्यर्थ आहे.”३. युवकांसाठी संदेश : “शॉर्टकटने यश मिळत नाही. सातत्य, शिस्त आणि मेहनत हाच खरा मार्ग आहे.”

फिटनेसचे महत्त्व – आजची गरज!

आज मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा यांसारखे आजार लहान वयातच जडत आहेत. अशा वेळी कैलासजी सांगतात, “औषधाच्या गोळ्यांपेक्षा घामाचा एक थेंब केव्हाही चांगला. रोज १ तास पोहणे, चालणे किंवा सायकलिंग करा. फिटनेस हीच तुमची खरी बँक बॅलन्स आहे.”त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीमुळे जालन्यातील अनेकांनी आता पहाटे जलतरण तलावाची वाटû धरली आहे. त्यांच्या कार्यामुळे जालना जिल्हा “फिट जालना, हिट जालना” या मोहिमेतही आघाडीवर येत आहे.या महान कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

महिलासक्षमीकरणठाणे पोलीस दलातील शीतल खरटमल यांची ऐतिहासिक कामगिरी; बँकॉक आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी..

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन