
‘Train-to-Trainer’ उपक्रमांतर्गत बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बुलढाणा, प्रतिनिधी m, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ‘अमृत वर्ग’ तसेच ‘Train-to-Trainer’ उपक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना विविध विषयांची माहिती देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाच्या अनुषंगाने, राज्यस्तरीय जबाबदारी सोपवण्यात आलेले कैलास कुलकर्ते सर यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अमृत वर्ग घेतले. या दौऱ्यादरम्यान एड्यु हायस्कूल, प्रबोधन विद्यालय,नित्यानंद आश्रम, हिवरा आश्रम या तीन शाळांमध्ये अमृत वर्गांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, जागरूकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाची भावना वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला.
या उपक्रमासाठी अमृत संस्थेचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्रेश कमानी आणि नंदाकिशोर मगर उपस्थित होते. त्यांच्या सहभागातून जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये अमृतच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शनपर उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी पोहोचविण्यासाठी अमृत संस्थेमार्फत असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्रेश कमानी यांच्याशी संपर्क साधावा: ९११२२२७६३७.पत्ता: जिल्हा कार्यालय, फ्लॅट नंबर ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा – ४४३००१.
00000



