नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी -सौ. सुजाता सुरज पाटील(महापौर, नवी मुंबई)
नवी मुंबई प्रतिनिधी-
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासोबतच त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने त्यांनी रबाळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ७४ आणि वाशीगाव येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. २७ या शाळांना भेट देऊन तेथील सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक त्या सूचना केल्या.
या दौऱ्यादरम्यान शाळांच्या इमारतींची पाहणी करून तेथील पायाभूत सुविधा, आवश्यक सोयीसुविधा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती घेतली. शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक अनुकूल करण्याच्या दृष्टीने संबंधितांशी संवाद साधून आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी, आधुनिक शैक्षणिक सुविधांचे पाठबळ आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सक्षम शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक श्री.सुधाकर सोनवणे ,नगरसेवक श्री. शिवराम पाटील, श्री. शिरीष पाटील, श्रीम.मीनाक्षी पाटील ,नगरसेवक श्री.निशांत भगत, श्रीम. प्रिती भगत, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीमती संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी श्री. अशोक कडूस शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड उपस्थित 000000