vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरज येथेअडीच हजार शासकीय लाभाचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरज येथेअडीच हजार शासकीय लाभाचे वितरण

 

 सांगली, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरज येथे आयोजित शिबिरात विविध शासकीय सेवा व योजनांच्या माध्यमातून एकूण 2 हजार 568 शासकीय लाभांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार डॉ. अर्पणा मोरे-धुमाळ यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे, शासकीय योजनांच्या मंजुरीची कागदपत्रे तसेच आवश्यक सुविधांचे वितरण करण्यात आले.

 या शिबिरामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप, आधार कार्ड सुविधा, महसूलविषयक नोंदी, मदारी व गोसावी समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, सामाजिक सहाय्य योजनांतर्गत मंजूर लाभांची प्रमाणपत्रे, ऑनलाइन शिधापत्रिका आदी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत लहान मुलांना किटचे वाटप, मातृत्व योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेशांचे वितरण, आभा कार्ड तसेच इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

 विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ सुलभतेने मिळवून देणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा सेवा संकल्प अभियानाचा उद्देश आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध घटकांतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत झाली.

00000

संबंधित पोस्ट

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील चेन्नई इथे 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात -आमदार बाबुसिंगजी महाराज

ओबीसी आश्रमशाळांमधून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्या – मंत्री अतुल सावे

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत असे करा मतदान…