vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित विविध उपक्रम

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित विविध उपक्रम

 

 सांगली, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी ग्रंथालय येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा मराठी भाषा समिती (सांगली), जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय (सांगली) आणि महात्मा गांधी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. वाचनाचे महत्त्व सांगणारे व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचे अभिवाचन असे उपक्रम या अंतर्गत घेण्यात आले.

 या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे, महात्मा गांधी ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळाचे कार्यवाह अभयकुमार लाड, गांधी ग्रंथालय विश्वस्त मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. लताताई देशपांडे आदि उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी ‘मोबाईलचा मोह सोडा आणि वाचनाशी नाते जोडा’ हा विषय विषद करून सांगितला. मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि विचार व ज्ञानविश्व व्यापक करण्यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 महात्मा गांधी ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळाचे कार्यवाह अभयकुमार लाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ‘शेतकऱ्यांच्या आसूड’ या पुस्तकातील साहित्याचे अभिवाचन केले. टी. एन. सपकाळ यांनी ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गांधी ग्रंथालयाच्या विश्वस्त मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. लताताई देशपांडे यांनी केले.प्रारंभी महात्मा गांधी ग्रंथालयात महात्मा गांधीजी आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे स्वागत आणि प्रास्ताविकात वाचन प्रेरणा दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम केले जात असल्याचे सांगून यावर्षीही पुस्तक प्रदर्शन, व्याख्यान आणि अभिवाचन आयोजित केले आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. ग्रंथपाल दिगंबर सूर्यवंशी यांनी आभार मानले.

 कार्यक्रमास महात्मा गांधी ग्रंथालयाचे विश्वस्त विलास शहा, शशिकांत पाटणे, शरद शहा, कार्यवाह शरद पाटील, मीनाक्षी चंद्रशेखर, आनंदराव जाधव, दिलीप शिंदे, सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष विकास जोशी, वि. स. खांडेकर वाचनालयाचे अध्यक्ष बेलवलकर, सिकंदर अमीन आदि उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ईस्त्रो सहलीसाठी रवाना

भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती कराव-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन

अमराठी चालकांनी ‘मराठी संवाद भाषा’ अभियानात सहभागी व्हावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· स्थगितीचा कालावधी मराठी शिकण्यासाठी वापरा· १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळेकेंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील-न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर• विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी• विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग