vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत

सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उप आयुक्त (उद्योग व सेवा) यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत अर्जांचे वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया दि. ११ मे २०२६ पासून सुरू आहे. प्राप्त अर्जांमधील पात्र कर्ज प्रकरणे बँकांकडे शिफारशीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

अर्ज वाटप व स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. ३० नोव्हेंबर २०२६ असून, अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुक सुशिक्षित बेरोजगारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती

महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी खाद्यजत्रा; बचतगटांच्या उद्योजकतेला नवे व्यासपीठ-पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀

हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ.. जागतिक तणावाचा बाजारपेठेवर परिणाम; पाहा आजचे ताजे दर

vishwatmaklokswamivarta