vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्सचे वितरण

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्सचे वितरण

 

जालना, दm प्रतिनिधी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दिलासा देण्यासाठी शासनामार्फत सुधारित रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्स वितरण योजना राबविण्यात येत आहे. यंदा जालना जिल्ह्यासाठी एकूण 10 हजार 585 रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्स मंजूर करण्यात आल्या असून, त्यांचे वितरण 10 नोव्हेंबर 2026 पूर्वी करण्याचे नियोजन आहे

जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक मिनीकिटमध्ये चार किलो वजनाचे ज्वारीचे बियाणे, प्रक्रिया केलेल्या बियाण्याची जैविक खताची पाकिटे तसेच पीक लागवडीविषयक माहितीपत्रक व ई-बाबींचा समावेश असणार आहे. कमी पाण्यात उत्पादन देणारे आणि प्रतिकूल हवामानात तग धरणारे सुधारित ज्वारीचे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठीही ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक,या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना 10 नोव्हेंबर 2026 पूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने मिनीकिट्सचे वितरण करण्याचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहनऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अटी व शर्ती अर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक राहतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री अतुल सावेवैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री अतुल सावे

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण आरोग्यपुरक उत्पादनांवर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नांदेड महानगरपालिकेची खडकपुरा-वाघी रोडवर मोठी कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल*

मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सामाजिक समता कार्यक्रम संपन्न