vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माझ्या परिवारावर पाळत ठेवली जातेय, ,अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवलं जातंय – राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक

माझ्या परिवारावर पाळत ठेवली जातेय, ,अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवलं जातंय – नवाब मलिक

 

मुंबई प्रतिनिधी  :राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला भाग पाडत आहेत, अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून याचे पुरावे आपल्याकडे आहेत, ज्याबद्दल मी अमित शहांना तक्रार करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे

दोन महिन्यांपासून आम्ही आर्यन खान प्रकरणातील चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पाळत ठेवली जात आहे. याबाबत आमच्या हितचिंतकांनी एकाचा पाठलाग केला तेव्हा ते पळाले. या संशयिताची माहिती मी ट्विटरवर दिली आहे. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं की ते भाजपशी संबंधित असल्याचं कळतंय. अनिल देशमुख यांच्यासोबत जसा खेळ झाला तसंच सुरु आहे. याबाबत माझ्याकडे माहिती आली असून मी ती पोलिसांना देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून जर मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, त्यांना घाबरवलं जात असेल तर हे सहन केलं जाणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे What’s App चॅट आहेत, मी याबाबत अमित शहांना तक्रार करणार असल्याचंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलं.

“अनिल देशमुख यांच्याविरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली, तसंच माझ्याबाबत केलं जातंय. माझ्या हाती याविषयी पुरावे लागले आहेत. केंद्रीय यंत्रणांचे काही अधिकारी स्वतः लोकांना माझ्याविरोधात मसुदा तयार करून पाठवत आहेत. त्यांना ईमेल आयडी देत आहेत. त्यांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. याचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”

संबंधित पोस्ट

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोग शनिवार दि. १५ रोजी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

vishwatmaklokswamivarta

खातेवाटपाचा तिढा सुटला? अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत; सूत्रांची माहिती

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना; लाभ घेण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा

खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्थापित 26 समित्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ओवे मैदान, खारघर येथे आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील जालना येथे  आयकर अधिकाऱ्यांची धाड 390 कोटींची माया जप्त; कारवाईसाठी ‘दुल्हल हम ले जायेंगे’चा कोड