vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यातील ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप**राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण*

*रायगड जिल्ह्यातील ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप**राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण*

 

*रायगड- प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ४० पात्र लाभार्थ्यांना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते अंत्योदय शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. या शिधापत्रिकांमुळे संबंधित लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून निवड करण्यात आलेल्या ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.अंत्योदय अन्न योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा लाभ उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिकांचे वितरण महत्त्वपूर्ण ठरते.या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

******

संबंधित पोस्ट

14 जुलै, 2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत.

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ

दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

बारावी परीक्षेचे गुणपत्रक-साहित्याचे वाटप सुरू 

vishwatmaklokswamivarta