vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

    सांगली प्रतिनिधी    पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे : राज्यातील 305 तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पशुधनाची चारा व पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळकाळात पशुधनाला आवश्यक असणारा चारा, चारा बियाणे व ठोंबे वाटप, वैद्यकीय उपचार व इतर अनुषंगिक सेवांचा पुरवठा अचूकपणे व्हावा, यासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची नोंदणी एनडीएलएम, अर्थात ‘भारत पशुधन प्रणाली’ वर अद्यावत करावी, तसेच नवीन पशुधनाचे टॅगिंग करून नोंदणी करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

        दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, मदत कार्य व सवलतींचा लाभ थेट गरजू पशुपालकांच्या पशुधनापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित पशुपालकांनी तात्काळ आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. आपल्या पशुधनाची अचूक नोंदणी व नवीन पशुधनाच्या कानात 12 अंकी बिल्ला टोचून त्याबाबत नोंद भारत पशुधन प्रणालीवर करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील 305 तालुक्यांमध्ये उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संगोपन व संवर्धन करणे ही पशुसंवर्धन विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाची अचूक नोंदणी आणि टॅगिंग ‘भारत पशुधन’ प्रणालीवर करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या डिजिटल नोंदणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत चारा बियाणे, ठोंबे व इतर मदत अचूकपणे व थेट पात्र पशुपालकापर्यंत पोहोचवणे आम्हाला शक्य होईल. सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) घाट ३ ते ६ जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदअतिवृष्टी, भूस्खलन व दरड कोसळण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर करावा – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा..

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

कारगिल विजय दिनानिमित्त लोककल्याण भवनात वीरांचा गौरव; अहिल्यानगरच्या कारगिल वीरांचा राज्यस्तरीय सन्मान

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta