परभणी लोकसभा प्रभारीपदी राजेंद्र राख यांची नियुक्ती-प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून संघटनात्मक जबाबदारी;काँग्रेस पदाधिकार्यांकडून अभिनंदन
जालना, प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र राख यांची परभणी लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे राख यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एका महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदारीची भर पडली आहे.
विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार्या राजेंद्रराख यांनी एनएसयूआयच्या माध्यमातून संघटनात्मक कार्याला सुरुवात केली.त्यानंतर काँग्रेस पक्षात विविध जबाबदार्या सांभाळत त्यांनी महाराष्ट्रप्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. पक्षसंघटनेतील त्यांचा अनुभव आणि कार्य लक्षात घेऊन त्यांच्यावर आता परभणी लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनात्मक कामाला गती देण्याचे आव्हान लोकसभा प्रभारी म्हणून राजेंद्र राख यांच्यासमोर परभणी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस संघटना अधिक मजबूत आणि सक्रिय करण्याचे महत्त्वाचे आव्हान असेल.स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे, संघटनात्मक प्रश्न समजून घेणे तसेच पक्षाच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, या बाबींवर त्यांना भर द्यावा लागणार आहे. राजकारणात पद मिळविण्याइतकेच त्या पदाच्या माध्यमातून संघटनेसाठी काम करणे, कार्यकर्त्यांशी संवाद कायम ठेवणे आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर राख यांच्यावर सोपविण्यात आलेली नवी जबाबदारी काँग्रेस संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी संघटनात्मक कामातून योगदान देण्याची संधी त्यांना मिळाली आहे.एनएसयूआय ते प्रदेश काँग्रेस; आता परभणीची जबाबदारी विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला राजेंद्र राख यांचा राजकीय प्रवास प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचला असून, आता परभणी लोकसभा प्रभारीपदाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला आहे.नव्या जबाबदारीतून परभणी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि पक्षाच्या विविध उपक्रमांना गती देणे, यावर त्यांचा भर राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुखयांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून राजेंद्र