vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ…

अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ….

 

विदेश प्रदेश प्रतिनिधी अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) बंदुकधाऱ्याने काही नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ माजली आहे. या घटनेनं सध्या टेक्सासमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं समजतंय. अमेरिकेतील टेक्सासमध्ये असलेल्या ज्यू सिनेगॉगमध्ये घुसून एका बंदूकधाऱ्याने अनेकांना ओलीस ठेवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कथित बंदूकधारी व्यक्तीने स्वतःची ओळख मुहम्मद सिद्दीकी अशी दिली आहे. ओलीस ठेवलेल्यांपैकी एकाची सुटका करण्यात यश मिळाल्याची देखील माहिती समोर आली आहे

अमेरिकेतील माध्यामांनी दिलेल्या बातम्यांनुसार, तो स्वत: ला एफबीआय एजंटच्या हत्येप्रकरणी 86 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचे सांगत आहे. तरी एफबीआयने म्हटले आहे की, त्यांना अद्याप बंदूकधारी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुष्टी केलेली नाही. इमारतीत किती लोक आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बंदुकधारी हा आफियाचा भाऊ नसल्याचं स्पष्टीकरण आफियाच्या भावाच्या वकिलांनी दिलं आहे. वकिलाने सांगितले की, त्यांचे अशील सुरक्षा यंत्रणांना फोन करत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की या संपूर्ण घटनेत त्यांचा सहभाग नाही.

 

संबंधित पोस्ट

अमीरबदल्लाहियान यांच्या अपघाती मृत्यूनंतर अली बागेरी इराणचे प्रभारी परराष्ट्र मंत्री

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

vishwatmaklokswamivarta

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये लीटर, अत्यावश्यक वस्तूही महाग

vishwatmaklokswamivarta

हिजाब’विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

विमानातील जेवणात आढळले मेलेल्या सापाचे डोके; तुर्की एअरलाईनच्या फ्लाइटमधील धक्कादायक घटना..