vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट असून देशाच्या सीमांमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.’’ असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे

भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट असून देशाच्या सीमांमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.’’ असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे

 

नवी दिल्ली प्रतिनिधी : ‘‘ भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट असून देशाच्या सीमांमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.’’ असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज मांडले. लष्कर दिनाच्या निमित्ताने येथे आयोजित संचलनप्रसंगी बोलताना त्यांनी मागील वर्ष हे लष्करासाठी खूप आव्हानात्मक होते असे सांगतानाच ईशान्येकडील सीमांवरील अस्वस्थतेचा हवाला दिला.नरवणे म्हणाले की, ‘‘ सीमेवरील तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत आणि चीनदरम्यानची लष्करी चर्चेची चौदावी फेरी नुकतीच पार पडली होती. आतापर्यंत या आघाड्यांवर प्रयत्न झाल्याने विविध भागांतून चीनने माघार घेतली असून हे एक सकारात्मक पाऊल मानावे लागेल. सध्या निर्माण झालेल्या तणावाबाबत उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

हिमाच्छादित पर्वतावर तैनात असलेल्या जवानांचे मनोधैर्य देखील पर्वताएवढेच उंच आहे. आमच्या संयमातून स्वतःवरील आत्मविश्वास दिसून येतो पण अन्य लोकांनीतो आजमावून पाहण्याची चूक करू नये. भारतीय लष्कर देशाच्या सीमांच्या रचनेतील एकतर्फी बदल कोणत्याही स्थितीमध्ये मान्य करणार नाही.’’‘ड्रॅगन’शी संघर्षपॅंगाँग तळ्याच्या परिसरातील रक्तरंजित संघर्षानंतर ५ मे २०२० पासून लडाखमध्ये भारत आणि चीन यांचे सैन्य आमनेसामने आले असून हा तणाव कमी व्हावा म्हणून दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या चौदा फेऱ्या पार पडल्या आहेत. सीमेवरील तणाव काही अंशी कमी झाला असला तरी ड्रॅगन वारंवार फुत्कार टाकत असतो.

संबंधित पोस्ट

उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या व उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना शासनाकडून मदतीचे निकष निश्चित करावेत- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन,विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन लेझीम, ढोल-ताशे, दिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी विशेष सूचना : बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे.

रशिया-गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात…

vishwatmaklokswamivarta