vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ…

अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ….

 

विदेश प्रदेश प्रतिनिधी अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) बंदुकधाऱ्याने काही नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ माजली आहे. या घटनेनं सध्या टेक्सासमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं समजतंय. अमेरिकेतील टेक्सासमध्ये असलेल्या ज्यू सिनेगॉगमध्ये घुसून एका बंदूकधाऱ्याने अनेकांना ओलीस ठेवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कथित बंदूकधारी व्यक्तीने स्वतःची ओळख मुहम्मद सिद्दीकी अशी दिली आहे. ओलीस ठेवलेल्यांपैकी एकाची सुटका करण्यात यश मिळाल्याची देखील माहिती समोर आली आहे

अमेरिकेतील माध्यामांनी दिलेल्या बातम्यांनुसार, तो स्वत: ला एफबीआय एजंटच्या हत्येप्रकरणी 86 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचे सांगत आहे. तरी एफबीआयने म्हटले आहे की, त्यांना अद्याप बंदूकधारी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुष्टी केलेली नाही. इमारतीत किती लोक आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बंदुकधारी हा आफियाचा भाऊ नसल्याचं स्पष्टीकरण आफियाच्या भावाच्या वकिलांनी दिलं आहे. वकिलाने सांगितले की, त्यांचे अशील सुरक्षा यंत्रणांना फोन करत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की या संपूर्ण घटनेत त्यांचा सहभाग नाही.

 

संबंधित पोस्ट

लेबनॉन  बेरुत येथे हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा नेता हसन नस्रल्ला मारला गेला असल्याचे – इस्रायली संरक्षण दल

vishwatmaklokswamivarta

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एलियास चर्चमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण गंभीर जखमी…

चीनमध्ये महामारीचा उद्रेक यांनी तयार केला तेथेच वाढला,कोरोना , मॉल्स बंद, तर लॉकडाऊन आणखी कडक

vishwatmaklokswamivarta

दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये भीषण दुर्घटना! हॅलोवीन फेस्टीव्हमध्ये चेंगराचेंगरीत १४९ जणांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

भारताची पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, केंद्र सरकारकडून पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्मवर बंदी.

vishwatmaklokswamivarta

नायजेरियात मोठी दुर्घटना! 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; अनेकांचा  मृत्यू, 90 च्या जवळ जण बेपत्ता झाल्याचे  वृत्त…

vishwatmaklokswamivarta