नायजेरियात मोठी दुर्घटना! 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; अनेकांचा मृत्यू, 90 च्या जवळ जण बेपत्ता झाल्याचे वृत्त…
विदेश प्रतिनिधी- आफ्रिकेच्या उत्तर नायजेरियाच्या नायजर नदीत मोठी दुर्घटना घडली. प्रवासी वाहतूक करणारी नदीत एक बोट उलटली. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून 90 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. ज्यात बहुतांश महिला आहेत. नायजरच्या राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते इब्राहिम औडू यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की सुमारे 200 प्रवासी बोटीत होते. सर्व लोक कोगी राज्यातून शेजारच्या नायजर राज्यात जात होते
कोगी स्टेट इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या प्रवक्त्या सँड्रा मोसेस यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बचाव पथकांना नदीतून 27 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तर अजूनही इतरांचा शोध सुरू आहे. घटनेनंतर 12 तासांपर्यंत एकही जिवंत व्यक्ती सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले
आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. कारण अधिकारी जलवाहतुकीसाठी सुरक्षा उपाय आणि नियमांची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक प्रवाशांना घेऊन जाणे, बोटींची नादुरूस्ती, क्षमतेपेक्षा जास्त जण बाहूण नेणे आणि देखभालीचा अभाव ही सर्व दुर्घटनांची कारणे आहेत.
कोगी स्टेट इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या प्रवक्त्या सँड्रा मोसेस यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बचाव पथकांना नदीत मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तर अजूनही इतरांचा शोध सुरू आहे.