vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथल्या  महिला  क्रिकेट विश्वाच्या भविष्यावरही टांगती तलवार..

, ऑस्ट्रेलियाचा दणका.! अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथल्या  महिला  क्रिकेट विश्वाच्या भविष्यावरही टांगती तलवार..

मेलबर्न देश प्रतिनिधी  – अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथल्या क्रिकेट विश्वाच्या भविष्यावरही टांगती तलवार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणारा एकमेव कसोटी सामनासुद्धा रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे की, तालिबान अफगाणिस्तानात महिला क्रिकेटवर बंदी घालणार असेल तर नोव्हेंबरमध्ये होणाऱी कसोटी रद्द करण्यात येईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं असं म्हटलं की, तालिबानच्या सरकारने महिलांना क्रिकेट खेळू न देण्याचे वृत्त जर खरे असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानविरोधात कसोटी सामन्याचे आयोजनही होणार नाही.

महिलांच्या क्रिकेटलासुद्धा आम्ही पुरुषांइतकेच महत्त्व देतो. महिलांना खेळू दिलं जाणार नसेल तर अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियात खेळता येणार नाही. राशिद खानसारख्या क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात कसोटी खेळताना पहायचे आहे. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा रोया समीम आणि तिच्या टीमला क्रिकेट खेळू दिलं जाईल.

संबंधित पोस्ट

स्पेनच्या कॅनरी बेटांच्या मार्गावर प्रवासी बोट बुडाली; किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

नेपाळच्या नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसले राहुल गांधी; व्हिडिओ शेअर करत भाजपने साधला निशाणा

पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये लीटर, अत्यावश्यक वस्तूही महाग

vishwatmaklokswamivarta

रशियातील तेलशुद्धीकरण केंद्रांवर युक्रेनचे ड्रोन हल्ले

vishwatmaklokswamivarta

येमेनच्या राजधानीत चेंगराचेंगरीची घटना, 78 नागरिकांचा मृत्यू

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta