vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अमेरिकेत 6 वर्षीय विद्यार्थ्याचा शिक्षिकेवर ‘लक्ष्य’ करून गोळीबार; धक्कादायक घटना

अमेरिकेत 6 वर्षीय विद्यार्थ्याचा शिक्षिकेवर ‘लक्ष्य’ करून गोळीबार; धक्कादायक घटना..

 

विदेश प्रतिनिधी

अमेरिकेतील धक्कादायक घटना

 

रिचनेत एलेमेंटरी स्कूल मध्ये कोणीही विद्यार्थी जखमी झालेला नाही. घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे. पण शिक्षिकेच्या जखमा जीवघेण्या आहेत.

 

अमेरिकेमध्ये  मागील काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना आल्या आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनिया  मध्ये शुक्रवारी एका सहा वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेवर हल्ला केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार पोलिसांच्या माहितीनुसार हा हल्ला अपघाताने घडला नसून त्याने लक्ष्य करून शिक्षिकेवर गोळीबार केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना एलिमेंटरी स्कूल मधील आहे. वादातून विद्यार्थ्याने शिक्षिकेवर गोळीबार केला असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान Richneck Elementary School मध्ये कोणीही विद्यार्थी जखमी झालेला नाही. घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे. गंभीररित्या जखमी झालेली शिक्षिका तिशीतील आहे. Schools Superintendent, Dr. George Parker यांनी प्रतिक्रिया देताना, ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. मुलांना सहज उपलब्ध होणार्‍या बंदुका आणि त्यामधून वाढणार्‍या या घटना यापासून दूर करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांकडूनही आरोपीकडून अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत का? याची तपासणी सुरू आहे. तसेच त्याच्या पालकांसोबतही संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे. व्हर्जिनिया डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनच्या वेबसाइटनुसार सदर शाळेत मध्ये सुमारे 550 विद्यार्थी आहेत जे किंडरगार्टनमध्ये पाचव्या इयत्तेपर्यंत आहेत. सोमवारी शाळेत वर्ग होणार नसल्याचे शाळेच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले आहे

 

संबंधित पोस्ट

यूके स्थित भारतीय अभियंत्याने बनवले विमान, कुटुंबासह करतो जगभर प्रवास

येमेनच्या राजधानीत चेंगराचेंगरीची घटना, 78 नागरिकांचा मृत्यू

2024 च्या विजेत्यांची नोबल क्वीन ऑफ द युनिव्हर्स…

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानला तालिबानी सरकारची सूत्रे मुल्ला अखुंदकडे, कोण-कोण आहे मंत्रिमंडळात?

vishwatmaklokswamivarta

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

थायलंड पोलिसांचे एक विमान समुद्रात कोसळले पाच पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू