
लेबनॉन बेरुत येथे हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा नेता हसन नस्रल्ला मारला गेला असल्याचे – इस्रायली संरक्षण दल…
विदेश प्रतिनिधी
इस्रायली संरक्षण दलाने म्हटले आहे की. ‘ऑपरेशन न्यू ऑर्डर’ सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेत लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दक्षिणेकडील दहिया जिल्ह्यातील हिजबुल्लाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. असता त्यांच्या मुख्यालयात बैठक घेत असताना इस्रायली हवाई दलाच्या विमानांनी हा जोरदार हवाई हल्ला केला. सदर हल्ल्यात हिजबुल्लाच्या प्रमुख मारला गेला असल्याचे वृत्त इजराइल संरक्षण दलाने दिले आहे
आयडीएफच्या माहितीनुसार
हसन नसरुल्लाह यापुढे जगाला घाबरवू शकणार नाही”, असे ट्विट करत आयडीएफ ने हिजबुल्लाच्या प्रमुखांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. नसरुल्लाहने 1992 पासून दहशतवादी गटाचे नेतृत्व केले होते. इस्रायली प्रसारमाध्यमांनी अहवाल दिला की हल्ल्यादरम्यान हिजबुल्लाच्या बालेकिल्ल्यावर 80 हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले, ज्यापैकी काही बॉम्ब एक टन स्फोटके असलेले होते. नसरल्लाहची मुलगी झैनाब, हिझबुल्लाहच्या कमांडरांसह, दक्षिण आघाडीचे नेते अली कारकी यांच्यासह, या कारवाईत ठार झाले, असेही इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, नस्रल्लाहला कोणतीही हानी झाली नसल्याचा हिजबुल्लाने या आदी दावा केला आहे



