vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केलेली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून त्यावरून शरद पवारांना टोला नारायण राणे 

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केलेली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून त्यावरून शरद पवारांना टोला नारायण राणे 

 

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केलेली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. भाजपकडून या मागणीसाठी राज्यभर आंदोलनही केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचाही शरद पवारांनी दाखला दिला होता. त्यावरुन आता राणेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.

व्वा पवारसाहेब, या वाक्यावरून काय बोलावं की आपली कीव करावी, मला कळत नाही. आमचा कधी दाऊद दोस्त नाही. आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहे. आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत. त्या दाऊदसोबत नवाब मलिकांचा संबंध आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली आणि आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत,” असा आरोप राणेंनी केला.

तुम्ही त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. तुम्ही हेच केलं आयुष्यभर. हीच तुमची पुण्याई आहे. या देशाचे नागरिक म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार. आमचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

शरद पवार राणेंबद्दल काय म्हणाले होते?

भाजपकडून केल्या जाणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना शरद पवार म्हणाले होते, ‘नवाब मलिकांचा राजीनामा घ्या असं ते का म्हणतात? कारण त्यांना अटक केली आहे. कबूल आहे. मला काळजी एकच आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे एक जुने सहकारी आहेत, राणे साहेब… त्यांनाही अटक केल्याचं वाचलं होतं. तुमच्या कोणाच्या वाचनात आलं की नाही माहित नाही. त्यांनाही अटक केली होती. त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला असं काही माझ्या अद्याप पाहण्यात आलेलं नाही,” उत्तर पवारांनी दिलं होतं

संबंधित पोस्ट

आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाआधी भाजपची आक्रमक घोषणाबाजी; नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर ठाम

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

vishwatmaklokswamivarta

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील प्रसिद्ध असलेले चर्चगेट स्टेशनचे नाव बदलणार चर्चगेट स्थानकाचे नामकरण चिंतामणराव देशमुख स्टेशन असे करण्याचा ठराव मंजूर केला.

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस-राष्ट्रवादीचा, शिवसेनेशी दुजाभावकरत असल्याची तक्रार शिवसेनेच्या बैठकीत चर्चा

विधानसभा लक्षवेधी सूचना :परिशिष्ट दोनमधील झोपडीधारकाला एकदा हस्तांतरणाचा अधिकार देण्याबाबत शासन सकारात्मक- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे