vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत पेपरफुटी, मुंबई पोलिसांकडून मालाड येथील खासगी क्लासमधील शिक्षकास अटक

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत पेपरफुटी, मुंबई पोलिसांकडून मालाड येथील खासगी क्लासमधील शिक्षकास अटक…

मुंबई प्रतिनिधीराज्यात पुन्हा एकदा पेपरफुटी (HSC Exam Paper Leak) झाल्याची घटना पुढे येत आहे. इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मालाड (Malad) येथील एका खासगी कोचिक क्लासेसच्या शिक्षकास अटक केली आहे

राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटी (HSC Exam Paper Leak) झाल्याची घटना पुढे येत आहे. इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मालाड (Malad) येथील एका खासगी कोचिक क्लासेसच्या शिक्षकास अटक केली आहे. या शिक्षकाने इयत्ता बारीवी बोर्ड परीक्षेचा पेपर आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्यात पाठीमागील काही काळापासून पेपरफुटीची बरीच प्रकरणे पुढे आली आहेत. ही प्रकरणे नोकरभरती संबंधित होती. मात्र, आता त्या श्रृंखलेत बोर्ड परीक्षाही आल्या आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मुकेश यादव असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेपूर्वीच पेपर या शिक्षकाच्या मोबाईल वर आला होता. हा पेपर या शिक्षकाने आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. क्लासमध्ये शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविण्यात आला. केमेस्टी (रसायनशास्त्र) या विषयाचा पेपर शनिवारी झाला. मात्र, तत्पूर्वीच या शिक्षकाने हा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांना दिलासा! मात्र पाणी कपात कायम! वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

श्री क्षेत्र कपिलधार मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थान –  मंत्री दीपक केसरकर…

vishwatmaklokswamivarta

एससी एसटी अक्ट अंतर्गत अनेक निरपराध व्यक्ती खोट्या खटल्यांचा बळी: केरळ उच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष: सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास; सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा