vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

समुद्रातील जहाजातून डिझेलची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व नवी मुंबई पोलिसांनी जानेवारी महिन्यात पकडलेल्या २ बोटींना बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना बेलापूर येथील जेटीत घडली

समुद्रातील जहाजातून डिझेलची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व नवी मुंबई पोलिसांनी जानेवारी महिन्यात पकडलेल्या २ बोटींना बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना बेलापूर येथील जेटीत घडली

 

नवी मुंबई मुंबई प्रतिनिधी- समुद्रातील जहाजातून डिझेलची तस्करी (Diesel Smuggling) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व नवी मुंबई पोलिसांनी (Police) जानेवारी महिन्यात पकडलेल्या २ बोटींना बुधवारी सकाळी अचानक आग (Fire) लागल्याची घटना बेलापूर येथील जेटीत घडली. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असली तरी यात एक बोट पूर्णपणे खाक झाली आहे. या बोटींना आग लागली की लावली? याबाबत संशय व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जानेवारीत मुंबई शिधावाटप विभाग व राज्यस्तरीय दक्षता पथकासह उलवे येथील खाडीमध्ये छापेमारी करून डिझेलच्या तस्करीसाठी वापरलेल्‍या दोन बोटी पकडल्या होत्या. यावेळी दोन्ही बोटीच्या वेगवेगळ्या कप्प्यात एकूण १६ लाख १० हजार रुपये किमतीचे २१ हजार ४७० लिटर डिझेल आढळले होते. कारवाईत पाच जणांना अटक केली होती. पोलिसांनी दोन्ही बोटी जप्त करून बेलापूर जेटीवर ठेवल्या होत्या.

डिझेलमुळे बोटी आगीच्या भक्ष्यस्थानीबोटींमध्ये काही प्रमाणात डिझेल आणि ऑईल असल्याने तत्काळ पेट घेतला. आगीची माहिती मिळताच सीबीडी येथील महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बोटींमध्ये डिझेल असल्याने दोन्ही बोट आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आगीत एक बोट पूर्णपणे खाक झाली असून दुसरी बोट वाचविण्यात आल्याची माहिती अग्‍निशमन दलाचे साहाय्यक केंद्र अधिकारी आर. जी. चौधरी यांनी दिली.

संबंधित पोस्ट

विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार अधिकृत ओळखपत्र

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष आज ‘ श्री ‘ ची होणार प्राणप्रतिष्ठा स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

विधानसभा निवडणूक २०२४; कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण-बिनचुक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दशसूत्री उपाययोजना

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ – शालेय शिक्षण विभागाची माहिती

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा — मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta