vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली

वाढत्या महागाईवर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल…

 

नवी दिल्ली प्रतिनिधीदेशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग पिचला गेला आहे.

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने महागाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. महागाईबाबत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला टोला (Central Govt) लगावला आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करताना लिहिले की, ‘राजा करे महल की तैयारी, प्रजा बेचारी महंगाई की मारी’  याआधी शनिवारी राहुल (Rahul Gandhi) यांनी महागाई आणखी वाढेल, असा इशारा दिला. यासोबतच देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली होती. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग पिचला गेला आहे

यापूर्वी पाच राज्यांमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतरही राहुल यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी एफडी, पीपीएफ, ईपीएफ आणि महागाईशी संबंधित आकडे ट्विट केले आणि जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवाल केला

 

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करणार… मंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ: शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्त्वाच्या लढाईची आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी; पहिल्यांदा लाईव्ह प्रक्षेपणही

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष शरद पवार येथील बंगल्यासमोर आंदोलन: एसटी कर्मचाऱ्यांचा विषय चिघळला, आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी.

vishwatmaklokswamivarta

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

vishwatmaklokswamivarta

श्री जगद्गुरू रेणुकाचार्य जयंती आहे. ती सर्व वीरशैवांनी भक्तिभावाने साजरी केली पाहिजे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र-रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र

vishwatmaklokswamivarta