vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशात महागाईचा डंका : बापरे…पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार

देशात महागाईचा डंका : बापरे…पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार

राज्यात पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार गेले आहे. औरंगाबादमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक 100.13 रुपये एवढा आहे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी पेट्रोलवर 3 तर डिझेलवर 2 टक्के अतिरिक्त कर लागतो. त्यामुळे ही दरवाढ इतर शहरांपेक्षा अधिक आहे. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झालंय. 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रू. महागलंय. या दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे.

 

सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडले आहे. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झाले आहे. तर 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे. आधीच महागाईत वाढ होत असताना त्यात अधिक भर पडणार आहे.

 

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवस वगळता दररोज दरांत वाढ होतेय. आजच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागले आहे.

 

 

राज्यातील प्रमुख शहरातील दर पाहा

औरंगाबाद :

पेट्रोल -( Petrol) – 115.83

डिझेल – (Diesel) – 100.13

 

अमरावती :

पेट्रोल -( Petrol) -115.68

डिझेल – (Diesel) -100.01

 

 

परभणी :

पेट्रोल – ( Petrol) – 117.24

डिझेल – (Diesel) – 99.97

 

नाशिक :

पेट्रोल -( Petrol) -114.60

डिझेल – (Diesel) – 97.43

 

 

पुणे :

पेट्रोल – ( Petrol) -113.69

पेट्रोल – Power Rs -118.19

डिझेल – (Diesel) – 96.56

 

कोल्हापूर :

पेट्रोल – ( Petrol) – 114.27

पेट्रोल – Speed – 117.08

डिझेल – (Diesel) – 97.14

 

रायगड :

पेट्रोल – ( Petrol) – 114.29

डिझेल – (Diesel) – 97.11

संबंधित पोस्ट

कोरोनाच्या दोन्ही लाटेत राज्यातील 28 हजार मुले अनाथ  शासन मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर..

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने डीएमके सरकारमधील ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर छापा

vishwatmaklokswamivarta

निवडणुक आयोगाकडून केवळ पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं ‘शिवसेना’ पक्षाचं नाव नाही, निलम गोऱ्हेंचा ‘शिवसेना’ पक्ष नावाबाबत मोठा खुलासा

vishwatmaklokswamivarta

आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

महादेव अ‍ॅपसह 21 ऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅप ब्लॉक, छत्तीसगडमध्ये ईडीच्या छाप्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

vishwatmaklokswamivarta

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर नोंद करावी  -विभागीय कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने

vishwatmaklokswamivarta