vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

DHL Cargo Plane: आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमानाचे झाले दोन तुकडे.

DHL Cargo Plane: आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमानाचे झाले दोन तुकडे…

 

विदेश प्रतिनिधीगुरुवारी सकाळी 10.30 वाजता हा अपघात झाला. बोइंग-757 विमानाने सांता मारिया विमानतळावरून उड्डाण केले. पण त्यानंतर 25 मिनिटांनीच ते परत आले.

 

DHL Cargo Plane: मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका या देशात गुरुवारी एक भीषण विमान अपघात झाला. यामध्ये इमर्जन्सी लँडिंग करताना विमान मध्यभागी तुटल्याने त्याचे दोन तुकडे झाले. या विमान अपघाताची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टा रिका (Costa Rica) मधील जुआन सांता मारिया (Juan Santa Maria) आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी हा अपघात झाला.

वास्तविक, DHL च्या मालवाहू विमानात काही यांत्रिक समस्या होती. त्यानंतर त्याचे जुआन सांता मारिया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यादरम्यान त्याचे दोन तुकडे झाले. दिलासादायक बाब म्हणजे, अपघातग्रस्त विमान हे मालवाहू विमान होते. कार्गो विमानात फक्त दोन क्रू मेंबर्स होते. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. वैमानिकालाही कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. 

जर्मन कंपनी DHL चे हे पिवळ्या रंगाचे विमान जमिनीवर आले तेव्हा त्यातून धूर निघत होता. असे सांगितले जात आहे की, ते धावपट्टीवरून घसरले आणि नंतर विमानाच्या मागील चाकाजवळ दोन तुकडे झाले.

 

संबंधित पोस्ट

बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोडवर सात मजली इमारतीला आग दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू

सिंगापूरमधून एक लाखाहून जास्त परदेशी व्यावसायिकांचे काेराेनाच्या कडक नियमांमुळे पलायन..

अमेरिका पुन्हा गोळीबाराने हादरली; मिसिसिपीमध्ये रॅपिड फायरिंगमध्ये 6 जणांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

सीरीयाच्या समुद्र किनारपट्टीवर प्रवासी बोट बुडाली, 34 जणांचा मृत्यू, 14 जण बचावले

vishwatmaklokswamivarta

2024 च्या विजेत्यांची नोबल क्वीन ऑफ द युनिव्हर्स…

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ…

vishwatmaklokswamivarta