vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

Gold-Silver Price: सोनं महागलं, चांदी मात्र स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price: सोनं महागलं, चांदी मात्र स्वस्त; जाणून घ्या आजचे दर…

 

व्यवसाय प्रतिनिधीGold-Silver Price Today: सोन्याच्या दरात चढउतार होत असतात. आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ घेतली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,300 आहे, जी काल 49,150 रुपये होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 150 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत-देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 53,780 रुपये आहे. कालच्या दिवशी ही किंमत 53,620 रुपये होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 160 रुपयांनी वाढ झाली आहे. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

चांदीच्या भावात घसरण-चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,400 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 68,300 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 900 रुपयांची घसरण दिसून आली आहे.सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.हॉलमार्क (Hallmark)-सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

 

संबंधित पोस्ट

उमेदवारांना 9 नोव्हेंबरला मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन,भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी .

vishwatmaklokswamivarta

बंद उद्योग घटकांनी एक महिन्याचा आत उद्योग सुरू करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद्धतीने पदभरती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याचा जीडीपी २०२७-२८ पर्यंत तीन लाख कोटींवर नेण्याचा संकल्प – जिल्हाधिकारी किशन जावळे

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! 🚀

रब्बी हंगामात 3 लक्ष 36 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन.

vishwatmaklokswamivarta