vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

रब्बी हंगामात 3 लक्ष 36 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन.

रब्बी हंगामात 3 लक्ष 36 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन.

 

 

बुलडाणा, प्रतिनिधी:- जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरी 682.70 मि.मी. पर्जन्यमान झालेले आहे. खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पेरणी 7 लक्ष 35 हजार 831 हेक्टरवर झालेली आहे. तर रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र 3 लक्ष 36 हजार 453 हेक्टरचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली.

 

 

 

रब्बी हंगामातील नियोजन याप्रमाणे : गहू 60 हजार 117 हे., हरभरा 2 लक्ष 25 हजार हे., ज्वारी 20 हजार हे., करडई 1 हजार हे., सुर्यफुल 106 हे., मका 30 हजार हे., तीळ 10, जवस 20 हे., इत्तर 200 हेक्टर असे एकूण 3 लक्ष 36 हजार 453 हेक्टर क्षेत्र लागवडीचे नियोजन आहे.

 

 

 

जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार एकुण लघु प्रकल्प 41 असून संकल्पित साठा 467.99 (द.ल.घ.मी) एवढे आहे. आज रोजी 227.567 (द.ल.घ.मी) एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. या वर्षी अत्यंत कमी पाऊस असल्यामुळे कमीत कमी पाण्यावर येणारे रब्बी पिकांचे नियोजन करण्यात यावे. जसे की, रब्बी ज्वारी, करडई, सुर्यफुल, मका, तीळ, जवस इत्यादी पिकांचे पेरणी नियोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

 

0000

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत -मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता 22 बालके मुंबईला रवाना

vishwatmaklokswamivarta

बाईक रॅलीव्दारे सांगलीत मतदार जनजागृती

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर रु. 5 तर दूध भुकटी निर्यातीस रु. 30 प्रति किलो प्रोत्साहन अनुदान

ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट,महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व व्यापारासंदर्भात झाली चर्चा…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र उदयोन्मुख तंत्रज्ञान निधी स्थापन करण्याचा निर्णय- उद्योग मंत्री उदय सामंतॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग विकासासाठी धोरण तयार करण्यात येणार प्रादेशिक मराठी आशय निर्माण करणाऱ्या स्टुडिओंना देखील स्वतंत्ररित्या प्रोत्साहन