vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट,महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व व्यापारासंदर्भात झाली चर्चा…

ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट,महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व व्यापारासंदर्भात झाली चर्चा…

 

 

मुंबई, प्रतिनिधी:- ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री. मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले.

 

कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

 

कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरण बदलावर व त्यानुसार शेतीमध्ये केलेले प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात ऊसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाण्याची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना ब्राझीलला पाठवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच शिष्टमंडळाने मंत्री श्री. मुंडे यांना नोव्हेंबरमध्ये ब्राझील दौऱ्याचे निमंत्रण दिले. याशिवाय दिल्लीमध्येही होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

 

या शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगणर, भारतीय दुतावासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, कौन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

 

मंत्री श्री. मुंडे यांनी राज्यातील पारंपरिक शेती व त्यामध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांविषयी माहिती दिली तसेच राज्यातील कृषी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबतही माहिती दिली.

संबंधित पोस्ट

खापाल कामकाजासाठी वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्याइच्छुक सेवानिवृत्त लेखापालांनी अर्ज करावेत….

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;इच्छुकांकडून कर्ज प्रस्ताव मागविले

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta