vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून ते त्याला क्लिन चिट मिळेपर्यंत नवाब मलिकांची अटक; समीर वानखेडेंची बदली  ..?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून ते त्याला क्लिन चिट मिळेपर्यंत नवाब मलिकांची अटक; समीर वानखेडेंची बदली  ..?

मुंबई प्रतिनिधी

२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. कॉर्डिलिया या क्रूझवर एनसीबीने कारवाई केली आणि आर्यन खानसह आठ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पुढचा महिनाभर हे प्रकरण गाजत होतं. तर ही कारवाई करणारे त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे यांची आता चेन्नईत बदली झाली आहे. मागच्या आठ महिन्यात काय काय घडलं आपण जाणून घेऊ या बातमीतून-

समीर वानखेडे यांची आता महसूल गुप्तचर संचलनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून नॉन सेसिंटिव्ह पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबरला अटक झाली होती त्यानंतर तो सुमारे २० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरूंगात होता. त्याला २७ ऑक्टोबरला जामीन मिळाला आणि तो ३० ऑक्टोबरला तुरुंगाबाहेर आला.

आर्यन खानवर समीर वानखेडे यांनी कारवाई केल्यामुळे ते चर्चेत आले खरे. मात्र आर्यन खानच्या अटकेनंतर आरोप आणि प्रत्यारोपांची खरी लढाई रंगली ती नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात. २ ऑक्टोबरची कारवाई झाल्यानंतर चार दिवसातच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे फर्जिवाडा असल्याचं म्हटलं होतं. त्या एका पत्रकार परिषदेनंतर जवळपास रोज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा ट्विट करून समीर वानखेडेंवर विविध आरोप केले.नवाब मलिक यांचे आरोप काय होते?

आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) निशाणा साधला होता. मलिक यांनी एनसीबीचे साक्षीदार फिक्सर असल्याचा आरोप केला होता. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट छापे मारते. असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर एनसीबीचे अधिकारी अस्वस्थ झाले. पण तरीही त्यांनी यावर फार काही भाष्य केलं नव्हतं.

यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे आणि फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीचे फोटो शेअर करुन काही सवाल उपस्थित केले होते. समीर वानखेडे यांना शाहरुख खानकडून पैसे वसुल करायचे होते असाही आरोप नवाब मलिकांनी केला होता.

फ्लेचर पटेल हा जास्मिन वानखेडेंचा भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे. पण हाच व्यक्ती एनसीबीच्या अनेक प्रकरणांमध्ये पंच किंवा साक्षीदार कसा काय असतो? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.

नवाब मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधताना आणि म्हटले की, समन्स बजावण्यात आलेले सेलिब्रिटी हे मालदीवमध्ये होते तेव्हा समीर त्यांच्याकडून पैसे गोळा करायला गेला होते का?

समीर वानखेडे हे जातीने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

एवढंच नाही तर समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटोही त्यांनी ट्विट केला होता, त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांचं एक वक्तव्यही समोर आलं होतं की समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. त्यावरूनही नवाब मलिक यांनी आरोप केले होते.

समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

या सगळ्या दरम्यान समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे, दुसरी पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर तसंच जस्मिन वानखेडे यांनी वारंवार भाष्य करत समीर वानखेडे यांचा बचाव करण्याचा आणि त्यांची बाजू कशी योग्य आहे त्यांना कसा जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे? हे वारंवार सांगितलं. त्यामुळे क्रांती रेडकर, ज्ञानदेव वानखेडे विरूद्ध नवाब मलिक यांच्यातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्रावीण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.

समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखालीच गेल्या दोन वर्षांत १७ हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उध्वस्त केलं आहे. मागच्या वर्षातच वानखेडे यांनी DRI मधून NCB मध्ये बदली करण्यात आली होती. आता आर्यन खान प्रकरणात तोंडघशी पडल्यानंतर समीर वानखेडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

मंत्री नवाब मलिक.

नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर काय काय झालं?

समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने विविध आरोप केल्यानंतर मुख्य गोष्ट ही घडली की या प्रकरणातले पंच तसंच साक्षीदार गायब झाले. मनिष भानुशाली, किरण गोसावी, प्रभाकर साईल असे सगळेच जण एका पाठोपाठ एक कुणाच्याच समोर आले नाहीत.

ऑक्टोबर महिन्यातच किरण गोसावीचा ड्रायव्हर असलेला प्रभाकर साईल हा साक्षीदार फुटला आणि या सगळ्या प्रकाराला एक नवं वळण मिळालं. प्रभाकर साईलने केलेला प्रमुख आरोप हा होता की समीर वानखेडेंना शाहरुख खानकडून बक्कळ खंडणी वसूल करायची होती. त्यासंदर्भात डील झालं होतं ते फिस्कटल्याने आर्यन खानला अडकवण्यात आलं असंही त्याने सांगितलं.

प्रभाकर सईलच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी रात्री प्रभाकरचा जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आला आहे. डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याने प्रभाकरचे म्हणणे घेतले असून, त्यानंतर तपास सुरू केला

२६ ऑक्टोबर २०२१ ला समीर वानखेडे दिल्लीतल्या एनसीबीच्या मुख्यालयात गेले होते दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुख्यालयात एसएन प्रधान यांची भेट त्यांनी घेतली.

यानंतर आर्यन खान आणि कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास दिल्ली एनसबीच्या विशेष तपास पथकाकडे गेला.

संबंधित पोस्ट

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

मुंबई तील भायखळ्यात शिक्षकाकडूनचं विद्यार्थीनीचा विनयभंग, कोचिंग क्लासच्या बहाण्याने शोषण….

vishwatmaklokswamivarta

समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या-फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकावर गुन्हा दाखल…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सायबर पोलिस विभागाचा इमेल हॅक करून सर्व शासकिय ईमेल पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई सायबर विभागाचे ईमेल हॅक…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यात खबऱ्याने गेम, जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, जुगाऱ्यांची काढली वरात..

पुण्यामध्ये कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta