vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेल  आज भाजपमध्ये  प्रवेश करणार

गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेल  आज भाजपमध्ये  प्रवेश करणार

नवी दिल्ली प्रतिनिधी: गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेल  आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेलनं एक ट्विट केलंय. हार्दिक पटेलनं ट्विट करून लहान सैनिक म्हणून काम करणार असल्याचं सांगितलंय. हार्दिकनं गेल्या महिन्यात काँग्रेसच्या  प्रदेश कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.आज (गुरुवार) सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये हार्दिकनं म्हटलंय, ‘राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी  यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणूनही काम करेन.’

हार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणारहार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. हार्दिक सौराष्ट्रातील मोरबी किंवा अहमदाबाद जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावामधील विरमगाम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. त्यानं भाजपकडून निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले आहेत.

हार्दिकची काँग्रेसला सोडचिठ्ठी हार्दिक पटेलनं 18 मे रोजी गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा, तसेच प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना हार्दिक म्हणाला होता, मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचं माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असं त्यानं नमूद केलं होतं.

संबंधित पोस्ट

काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती*

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

कसबा पेठ ची जनता एवढ्या वर्षांच्या भ्रमातून बाहेर पडली तर देशही बाहेर पडू शकेल’ म्हणत उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

गोवा फॉरवर्ड’चे लवकरच काँग्रेसमध्ये विलिनीकरण!

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टी चे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष  नाना पटोले सागर बंगल्यावर

vishwatmaklokswamivarta

बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकत नाही. तुमचा निर्णय बारामतीच्या व महाराष्ट्राच्या हिताचा होईल, अशी मला खात्री आहे,’’ असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार