vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केंद्र सरकारचे अग्निपथ नव्हे तर अग्नि पेट चा काँग्रेस सायन कोळीवाडा विधानसभा पक्षातर्फे जाहीर निषेध..

केंद्र सरकारचे अग्निपथ नव्हे तर अग्नि पेट चा काँग्रेस सायन कोळीवाडा विधानसभा पक्षातर्फे जाहीर निषेध..

मुंबई प्रतिनिधी

भारत सरकारच्या अग्निपथ मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील युवकांची दिशाभूल करून, युवक ही राष्ट्राची संपत्तीच धोक्यात आणणाऱ्या योजनेचाऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये दिनांक 27.जून रोजी जाहीर निषेध होत आहे.

याचाच एक भाग म्हणून मुंबई रिजन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मां.आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वात दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस कमिटच्या सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्यांनी जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता यांच्या मार्गदर्शना मध्ये अंटोप हील परिसरात जनांदोलन छेडले असून,केंद्र सरकारच्या कुट नीतीचा जाहीर निषेध केला आहे.

सुमारे 300 कार्यकर्त्याच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांना **अग्निपथ नव्हे तर ही अग्नि पेट योजना**असून मोदी सरकारच्या या योजनेचे दुष्परिणाम लक्षात आणून देण्यात आले.तसेच मोदी सरकारने ही योजना त्वरित बंद करावी यासाठी धारणा आंदोलन शांततेच्या मार्गाने केले.

यावेळी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी चे **सरचिटणीस अमित शेट्टी,सायन कोळीवाडा विधानसभा प्रभारी साबीर अली, माजी नगरसेविका नैना दोशी तसेच दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस चे संघटक सचिव तानाजी घाग यांनी जनसमुदायाला संबोधित केले**यावेळी सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी **अग्निपथ योजनेचा** जाहीर धिक्कार केला.

कडक पोलीस बंदोबस्तात परंतु अतिशय शांततेच्या मार्गाने काँग्रेसच्या परंपरेला साजेल असे हे आंदोलन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत.

संबंधित पोस्ट

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ततिवसा येथे ‘युनिटी पदयात्रा’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय युवा दिना निमित्त-दि. बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) बेलापूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा “महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!,शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती