vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ततिवसा येथे ‘युनिटी पदयात्रा’ संपन्न

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ततिवसा येथे ‘युनिटी पदयात्रा’ संपन्न

       अमरावती, प्रतिनिधी): भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘मेरा युवा भारत’ (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत देशभर ‘सरदार@150 अभियान’ अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येत आहेत. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान चालणाऱ्या या अभियानाचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यात या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा येथे आज ‘युनिटी पदयात्रा’ (सरदार@150 पदयात्रा) आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन तिवसा येथील गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, नायब तहसिलदार आशिष नागरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख, मेरा युवा भारतच्या स्नेहल बासुतकर उपस्थित होत्या.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. ही पदयात्रा या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पेट्रोल पंप, शहीद स्मारक मार्गे पुन्हा महाविद्यालयात येवून पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या ‘सरदार@150 पदयात्रे’त मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, विविध शाळा-महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

000000

संबंधित पोस्ट

विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळाअंतर्गत मान्यता मिळालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता

vishwatmaklokswamivarta

कमलादेवी कॉलेज आणि जेएसएस फाउंडेशनचा ‘प्रारंभ’ इव्हेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबई धारावीतील प्राऊड कार्यालयात महिला शिवण वर्गाचे उद्घाटन.. [

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढावे- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मेळघाट प्रादेशिक वनविभागाचा उपक्रमचिचाटी धबधब्याकडे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती सुरू; स्थानिक २० युवकांना मिळाला रोजगार…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta