vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई धारावीतील प्राऊड कार्यालयात महिला शिवण वर्गाचे उद्घाटन.. [

मुंबई धारावीतील प्राऊड कार्यालयात महिला शिवण वर्गाचे उद्घाटन..

[

मुंबई प्रतिनिधी –

ऑब्झीलीयम स्किल अकॅडमी वडाळा व प्राऊड अभिमान कमिटी धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील महिलांसाठी शनिवार  सायंकाळी साडेचार वाजता स्थळ माता महाकाली मैदान धारावी येथील कार्यालयात पाच शिलाई मशीन वर्गाचे औपचारिक रित्या वडाळा ब्रिज डॉन बॉस्को शेल्टरचे फादर रुडाल्फ डिसोजा व धारावी पोलीस ठाणे महिला पोलीस पथकाच्या प्रमुख श्रीमती सायली वारके तसेच सिस्टर रोजलीन परेरा यांच्या उपस्थिती व हस्ते शिवन वर्गाचे उद्घाटन करण्यात आले

प्राऊड महिला मंडळाच्या प्रतिनिधी इसरत खान व सरिता शेरखाने यांनी पाहुण्यांच्या परिचय करून कार्यक्रमाची माहिती दिली शिवण क्लासच्या श्रीमती ललिता मंदा यांनी नव्याने सुरू होणाऱ्या वर्गाची वेळ व उद्दिष्ट समजावून सांगून महिलांना माहिती दिली

धारावी पोलीस ठाणे निर्भयपतकाच्या श्रीमती सायली वारके यांनी सायबर सुरक्षा व महिला व बाल सुरक्षा तसेच विविध घटनांमध्ये होणारी फसवणूक याबद्दल कायदेविषयक माहिती दिली तर सिस्टर परेरा यांनी स्वयंरोजगारातील महिलांनी पुढे येऊन सक्षम होऊन इतर महिलांना मदत करावी असे आव्हान केले

कार्यक्रमाच्या मध्यावर उपाध्यक्ष दिलीप गाडेकर यांनी संस्थेत सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल भविष्यात सुरू होणाऱ्या स्वयंपाक झाल्याबद्दल उपस्थितीला माहिती देऊन देणगीचा संस्था व व्यक्ती यांचे आभार मानले

कार्यक्रमाकरिता अध्यक्ष सय्यद अली मुनाफ शेख इमान वेलू अलका साबळे जमील शेख कादर शेख ममता शिव तावरे मास्टर आदित्य यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला प्राऊड संचालक व विश्वस्त प्रशांत अँथनी यांनी सर्वांच्या आभार मानले

00000000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शाळा प्रवेशोत्सव 2025 : पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta