vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हास्तरीय कुष्ठरोग शोध अभियानाचे प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे उद्धाटन

जिल्हास्तरीय कुष्ठरोग शोध अभियानाचे प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे उद्धाटन

   अमरावती, प्रतिनिधी): जिल्हास्तरीय कुष्ठरोग शोध अभियानाचे प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे नुकतेच उद्धाटन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. पूनम मोहोकार, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.कें. शिराळा डॉ. हर्षा गोहत्रे, डॉ. श्रवण कडू उपस्थित होते.

    लवकरात लवकर सर्वच संशयित शोधून निदान निश्चिती करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असोलेयांनी आवाहन केले आहे. कुष्ठरोगाची लक्षणे, औषधोपचार निदान निश्चिती, सहवासितांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून द्यावयाची मात्रा यावर सहायक संचालक डॉ. मोहोकार यांनी मार्गदर्शन केले.

   कुष्ठरोग आजाराप्रती समाजामध्ये असलेली भीती, गैरसमज, अंधश्रद्धा दूर होऊन सर्वसामान्य आजारांप्रमाणे या आजारास सुद्धा जनतेने सामान्य आजार समजून त्वरित औषधोपचार घेण्यास पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. पारिसे यांनी केले.      जिल्हास्तरीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग ,प्राथमिक आरोग्यातील आरोग्य कर्मचारी, गावकरी, नागरिक यावेळी उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठीविशेष शिबिरे आयोजीत करा- जिल्हाधिकारी स्वामी

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 128 बालकांची मोफत 2डी इको तपासणी   पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार

जिल्हा स्त्री रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन; होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्काराचे होणार वितरण..

विशेष लेख_ निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती 🔴

vishwatmaklokswamivarta

सामाजिक सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न