vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मेस्को कार्यालयात माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी लिपिक टंकलेखक पदांसाठी अर्ज सुरू

मेस्को कार्यालयात माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी लिपिक टंकलेखक पदांसाठी अर्ज सुरू

      अमरावती, प्रतिनिधी): संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी मेस्को (MESCO) क्षेत्रीय कार्यालय, अमरावती येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती येथील क्षेत्रीय कार्यालयाकरिता लिपिक टंकलेखक या पदासाठी एकूण दोन जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला मासिक ठोक मानधन 30 हजार रुपये इतके दिले जाईल.

   उमेदवार हा सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ , ओआर आणि त्यांच्या विधवा,परित्यक्ता असावेत. अर्जदाराचे वय 57 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराकडे मराठी भाषेचे (बोलणे, लिहिणे, वाचणे) ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच अकाउंटिंग, एम एस – ऑफिस आणि मराठी, इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित असून, यासंबंधीचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात नेमणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

   कार्यालयीन अधीक्षक, मुख्य लिपिक स्तरावरील लिपिकांना प्राधान्य राहील. तसेच सशस्त्र सेना दलातून लिपिक पदावरून निवृत्त झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.शक्यतो मेडिकल कॅटेगरी SHAPE-1 किंवा SHAPE-2 असावी.

   पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील ई-मेल पत्त्यावर किंवा पोस्टाने पाठवावे. ई-मेल पत्ता: ro-amravati@mescoltd.co.in, कार्यालयीन पत्ता: क्षेत्रिय कार्यालय अमरावती, सेनिकी मुलांचे वसतिगृह, नावसरी अमरावती 444604 हा आहे. इतर अटी व शर्ती लागू राहतील. अधिक माहितीसाठी 07212952040 किंवा मोबाइल क्रमांक 9373164962/7495097958 वर संपर्क साधावा.

 

0000000

संबंधित पोस्ट

माजी सैनिकांसाठी पदभरती

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात..

महापारेषण’ आणि ‘महानिर्मिती’मध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta