vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

माजी सैनिकांसाठी पदभरती

माजी सैनिकांसाठी पदभरती

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी -सैनिकी मुलामुलींच्या वसतीगृह,कारगिल स्मृतीवन व सैनिकी विश्रामगृह येथे विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार असून माजी सैनिक, माजी सैनिक विधवा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.   सैनिकी मुला- मुलींचे वसतीगृह येथे सहाय्यक वसतीगृह अधीक्षक – १ पद, सहाय्यक वसतीगृह अधीक्षक (महिला उमेदवार-मुलींच्या वसतीगृहासाठी) – १ पद, चौकीदार – २ पद. सफाई कामगार – २ पद, स्वयंपाकी – ५ पद, माळी कामगार-२ पद.       सैनिकी विश्रामगृह येथे चौकीदार- १ पद, सफाई कामगार-१ पद, कारगिल स्मृतीवन येथे माळी कामगार १ पद.पात्रता- उमेदवार माजी सैनिक/ सैनिक विधवा असावे. शारिरीकदृष्ट्या सक्षम, सर्व पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.सोबत जोडावयाची कागदपत्रे -वैयक्तिक अर्ज, आधार कार्ड, रहिवासी दाखला, पी.पी.ओ. पासबुक, डिस्चार्ज बुक.     वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सोमवार दि.३० जून पर्यंत जमा करावे. मुलाखतीची वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. माजी सैनिक/ सैनिक विधवा यांच्यातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर नागरिक उमेदवारांमधून पदे भरण्यात येतील,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा रोड, छत्रपती संभाजीनगर (संपर्क ०२४०-२३७०३१३ येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्याजीवनचरित्राचा दिव्य आविष्कार,ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त,भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा सुरेल संगम

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

vishwatmaklokswamivarta