vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

भारतामध्ये आढळला नवा कोविड 19 ओमिक्रॉन सब व्हेरिएंट…

भारतामध्ये आढळला नवा कोविड 19 ओमिक्रॉन सब व्हेरिएंट…

विदेश प्रतिनिधी

WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.75 हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. “प्रथम भारतातून आणि नंतर सुमारे 10 इतर देशांमधून अहवाल आला,” असेही त्या म्हणाल्या

कोरोना वायरसचा (Corona Virus) नवा ओमिक्रॉन सब व्हेरिएंट (Omicron sub-variant) BA.2.75 आढळला आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश असल्याची माहिती World Health Organisation चे Director-General Tedros Adhanom Ghebreyesus यांनी दिली आहे. मागील 2 आठवड्यामध्ये जगभरात सुमारे 30% कोविड रूग्णांची वाढ झाली आहे. सहापैकी 4 जणांमध्ये सध्या मागील आठवड्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. युरोप, अमेरिकेमध्ये BA.4 आणि BA.5 हे व्हेरिएंट कोरोना लाटेचं कारण ठरत आहेत.

 

बुधवार (6 जुलै) दिवशी भारतामध्ये 16,159 कोविड रूग्ण समोर आले आहेत. दरम्यान 15,394 कोरोना रूग्णांनी या आजारावर मात देखील केली आहे. रिकव्हरी रेट 98.53 आहे. तर देशातील एकूण रूग्णसंख्या 4,29,07,327 पर्यंत पोहचली आहे

कालच्या ब्रीफिंग दरम्यान, WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.75 हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. “प्रथम भारतातून आणि नंतर सुमारे 10 इतर देशांमधून अहवाल आला,” असेही त्या म्हणाल्या आहेत. या सब व्हेरिएंट मध्ये अतिरिक्त रोगप्रतिकारक चोरीचे गुणधर्म आहेत की ते अधिक वैद्यकीयदृष्ट्या गंभीर आहेत हे जाणून घेणे सध्या घाईचं होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचार थांबत नाही, हिंदूंच्या बाजूने रॅली काढणाऱ्या इस्कॉनच्या चिन्मय दासला अटक..

vishwatmaklokswamivarta

घानामध्ये भीषण स्फोट; १७ जणांचा मृत्यू, शेकडो इमारतींचे नुकसान

vishwatmaklokswamivarta

चीनी सैन्यात पाकिस्तानी अधिकाऱ्यांची तैनाती! मोठ्या षडयंत्राचा प्रयत्न? भारताची करडी नजर.

इस्रायलचं ऑपरेशन ‘रायझिंग लायन’, इराणवर हवाई हल्ला, आणीबाणी जाहीर

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ…

vishwatmaklokswamivarta