vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

भारतामध्ये आढळला नवा कोविड 19 ओमिक्रॉन सब व्हेरिएंट…

भारतामध्ये आढळला नवा कोविड 19 ओमिक्रॉन सब व्हेरिएंट…

विदेश प्रतिनिधी

WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.75 हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. “प्रथम भारतातून आणि नंतर सुमारे 10 इतर देशांमधून अहवाल आला,” असेही त्या म्हणाल्या

कोरोना वायरसचा (Corona Virus) नवा ओमिक्रॉन सब व्हेरिएंट (Omicron sub-variant) BA.2.75 आढळला आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश असल्याची माहिती World Health Organisation चे Director-General Tedros Adhanom Ghebreyesus यांनी दिली आहे. मागील 2 आठवड्यामध्ये जगभरात सुमारे 30% कोविड रूग्णांची वाढ झाली आहे. सहापैकी 4 जणांमध्ये सध्या मागील आठवड्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. युरोप, अमेरिकेमध्ये BA.4 आणि BA.5 हे व्हेरिएंट कोरोना लाटेचं कारण ठरत आहेत.

 

बुधवार (6 जुलै) दिवशी भारतामध्ये 16,159 कोविड रूग्ण समोर आले आहेत. दरम्यान 15,394 कोरोना रूग्णांनी या आजारावर मात देखील केली आहे. रिकव्हरी रेट 98.53 आहे. तर देशातील एकूण रूग्णसंख्या 4,29,07,327 पर्यंत पोहचली आहे

कालच्या ब्रीफिंग दरम्यान, WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.75 हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. “प्रथम भारतातून आणि नंतर सुमारे 10 इतर देशांमधून अहवाल आला,” असेही त्या म्हणाल्या आहेत. या सब व्हेरिएंट मध्ये अतिरिक्त रोगप्रतिकारक चोरीचे गुणधर्म आहेत की ते अधिक वैद्यकीयदृष्ट्या गंभीर आहेत हे जाणून घेणे सध्या घाईचं होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

रशिया युक्रेन युद्ध: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी..  

सोमालिया तील दुहेरी बॉम्बस्फोटानं मोगादिशू हादरलं; स्फोटात 100 ठार तर 300 हून अधिक जखमी..

vishwatmaklokswamivarta

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना राज्य निधीच्या गैरवापराच्या आरोपाखाली अटक

vishwatmaklokswamivarta

रशियातील मॉस्को शहरात विमान कोसळले, वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांच्यासह 10 जणांचा मृ्त्यू…

vishwatmaklokswamivarta

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर, भारतीय समुदायाच्या सदस्यांकडून जोरदार स्वागत

vishwatmaklokswamivarta